BREAKING बुलडाण्यात बचत गट प्रदर्शनी चे बॅनर पाडण्याचा प्रयत्न! जयश्रीताई शेळके संतापल्या, म्हणाल्या, हीच ती गुंडशाही! विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली...

 
बुलडाणा
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा शहरात लावण्यात आलेले बचत गट प्रदर्शनीचे बॅनर फाडण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दिशा बुलडाणा जिल्हा बचत गट फेडरेशनच्या माध्यमातून तसेच जयश्रीताई शेळके यांच्या पुढाकारातून बुलडाणा शहरात दरवर्षी प्रदर्शनीचे आयोजन करण्यात येते, यंदाही या प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे..त्याच्या प्रसिद्धीसाठी बुलडाणा शहरात ठीक ठिकाणी बॅनर लावण्यात आले आहे. आज एक बॅनर फाडण्याचा प्रयत्न अज्ञातांनी केला. यावर जयश्रीताई शेळके यांनी संताप जनक प्रतिक्रिया दिली आहे. ही गुंडशाही आहे, झुंडशाही आहे.. विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे...
दिशा फेडरेशनच्या माध्यमातून महिलांसाठी मोठे काम उभे राहत आहे. काही विकृत मानसिकतेच्या लोकांना हे पाहवत नाही.त्यांच्या पोटात दुखते, स्वतः तर ते कोणतेही काम करत नाही उलट कामात खोडा आणण्याचा हा विकृत प्रयास आहे. हजारो माता भगिनींचा आशीर्वाद आपल्या सोबत आहे, त्यामुळे कार्यक्रम होईलच असेही जयश्रीताई शेळके म्हणाल्या .