सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात मशाल पेटली! मशाल यात्रेला तिसऱ्या दिवशी उदंड प्रतिसाद; दिलीप वाघ म्हणाले, सिंदखेडराजातील "दोन" गद्दारांना हद्दपार करण्याची हीच ती वेळ....

 
सिंदखेडराजा
सिंदखेडराजा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सध्याचे सरकार हे आतापर्यंतचे सर्वात असंवेदनशील सरकार आहे. राज्यात दररोज शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत,मात्र मुर्दाड सरकारला काहीही देणेघेणे नाही. शेतकरी मरला तरी त्याच्या टाळूवरच लोणी खायला हे सरकार टपून बसलेलं आहे. गद्दारी सरकारच्या रक्तात आहे. सिंदखेडराजातही दोन गद्दार आहेत, त्या गद्दारांना हद्दपार करण्याची हीच ती वेळ आहे असे रोखठोक प्रतिपादन माजी जिल्हा परिषद शिवसेना (उबाठा) चे नेते दिलीप वाघ यांनी केले. सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात निघालेल्या मशाल यात्रेदरम्यान आज,१९ सप्टेंबरला विविध गावांत आयोजित कॉर्नर बैठकीत ते बोलत होते. उपजिल्हाप्रमुख बद्री बोडखे, तालुकाप्रमुख महेंद्र पाटील यांच्यासह शेकडो शिवसैनिक व त्या त्या गावांतील ग्रामस्थ या बैठकांत उपस्थित होते.
 सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात दिलीप वाघ यांच्या नेतृत्वात मशाल यात्रा निघाली आहे. १५ सप्टेंबर रोजी तेजस्वी महाराज संस्थान वरुडी येथून निघालेली ही मशाल यात्रा मतदारसंघातील गावागावात जाणार आहे. २५ सप्टेंबरला सिंदखेड राजा तहसील कार्यालयावर होणाऱ्या शेतकरी आक्रोश मोर्चाने या मशाल यात्रेचा समारोप होणार आहे. या आक्रोश मोर्चाचे निमंत्रणही या मशाल यात्रेच्या निमित्ताने देण्यात येत आहे. गावागावात होणाऱ्या कॉर्नर बैठकांना प्रचंड प्रतिसाद मिळत असून या बैठकातून सरकार विरोधातील आक्रोश समोर येत आहे. 
राज्यात सध्या गद्दारांचे सरकार आहे. गद्दारांचे मुखिया आज बुलडाण्यात आले, मातृतीर्थ जिल्ह्याची भूमी गद्दारांना माफ करत नाही. त्यामुळे या गद्दार सरकारची अधोगती आजपासून सुरू होईल. विधानसभा निवडणुकीत गद्दार भुईसपाट होतील हे लिहून घ्या. सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातील दोन्ही गद्दारांचे हेच हाल होतील. मतदारसंघाला विकासापासून कोसो दूर ठेवणाऱ्यांना जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असेही दिलीप वाघ म्हणाले...