आज रविकांत तोफ धडाडणार..! बुलडाण्यात बोलावली शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक...; महत्वाचा निर्णय?

 
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आज,२५ फेब्रुवारीला बुलढाण्यात पदाधिकारी व कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत शेतकऱ्यांच्या मागण्या, रखडलेला पिक विमा, अनुदान, सोयाबीन कापूस भावफरक यासंदर्भात चर्चा होणार असून पुढील आंदोलनाची घोषणा देखील होऊ शकते..

आज,२५ फेब्रुवारीच्या दुपारी ११ वाजता बुलढाणा शहरातील चिखली रोडवरील हॉटेल शिवगड मध्ये ही बैठक होणार आहे. रविकांत तुपकर यांनी यादी देखील शेतकरी प्रश्नांवर राज्यभर गाजलेली आंदोलने विविध आंदोलने केलेली आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ते सातत्याने राज्य आणि केंद्र सरकार मधील वरिष्ठ मंत्र्यांच्या भेटीगाठी घेऊन पाठपुरावा करत आहेत. दरम्यान आता शेतकरी चळवळीची पुढील दिशा, आणि आंदोलनाची पुढील दिशा आजच्या बैठकीत ठरू शकते.