जालिंधर बुधवतांच्या नेतृत्वातील मशाल यात्रेचा आज दुसरा दिवस! मोताळा तालुक्यातील "या" १८ गावांत होणार निष्ठेचा जागर! ओपनिंगचा दिवस ठरला सुपरहिट....
Sep 6, 2024, 08:04 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवंत यांच्या नेतृत्वातील मशाल यात्रेला काल,५ सप्टेंबरला मोताळा येथून प्रारंभ झाला. नरेंद्र खेडेकर, जालिंधर बुधवंत यांची घणाघाती भाषणे, यात्रेच्या रथावर वाजणारे शिवसेनेचे गीत अन् भगव्या पताका आणि झेंड्याची वर्दळ यामुळे वातावरणात भगवा माहौल तयार झाल्याचे चित्र होते. गावागावांत होणारे यात्रेचे दमदार स्वागत, प्रत्येक गावांत आबाल - वृद्धांची मायमाऊल्यांची जालिंधर बुधवंत यांना भेटण्यासाठी होणारी गर्दी आणि आवाज कुणाचा- शिवसेनेचा या गगनभेदी घोषणा यामुळे यात्रेचा ओपनिंग डे सुपर हिट ठरला. कोथळी गावातील सभेने पहिल्या दिवसाचा समारोप झाला.आज,६ सप्टेंबरला ही यात्रा तब्बल १८ गावांत जाणार आहे.
सकाळी ८ वाजता राहेरा, ८.३० वाजता खामखेड, ९ वाजता खडकी, ९.३० वाजता मोहेगाव, १० वाजता खैरखेड, १०.३० वाजता राजूर,११ वाजता मूर्ती, ११.३० वाजता नेहरू नगर, १२ वाजता वारुळी,१२.३० वाजता वाघजाळ येथे भोजन असा मशाल यात्रेचा पहिला टप्पा राहणार आहे.
दुपारी दुसऱ्या सत्रात ३ वाजता टाकळी, ३.३० वाजता परडा, ४ वाजता सुलतानपूर, ४.३० वाजता शिरवा, ५ वाजता धामणगाव दे., ५.३० वाजता पिंपळगाव नाथ, सायंकाळी ६ वाजता गिरोली, ६.३० वाजता रामगांव तांडा असा यात्रेचा प्रवास राहणार आहे. निष्ठेचा जागर, शेतकऱ्यांच्या मागण्या आणि भ्रष्ट सरकारच्या विरोधात आक्रोश व्यक्त करण्यासाठी यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.