BREAKING मलकापूरातून पुन्हा चैनसुख संचेतींना तिकीट!
Oct 26, 2024, 17:38 IST
मलकापूर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): भाजपने आज आपली दुसरी यादी जाहीर केली. गेल्या कित्येक दिवसांपासून तिढा सुरू असलेल्या मलकापूरच्या जागेवर पुन्हा एकदा माजी आमदार चैनसुख संचेती यांना संधी देण्यात आली आहे. संचेती ७२ वर्षांचे असल्याने त्यांच्या ऐवजी नव्या दमाच्या उमेदवाराला संधी देण्यात यावी अशी मागणी भाजपमधून समोर येत होती मात्र संचेतीनी दबाव तंत्र वापरले आणि अखेर स्वतःच्या पदरात तिकीट पाडून घेतले. आता संचेती यांची लढत विद्यमान आमदार राजेश एकडे यांच्याशी होणार आहे.