

जिल्ह्यासाठी ३ शववाहिका मंजूर! केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांनी केला होता पाठपुरावा...
Mar 25, 2025, 11:22 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर हा मृतदेह अंतिम संस्कारासाठी त्याच्या घरापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून बुलढाणा जिल्ह्याला तीन शववाहीका मिळाल्या आहेत. या संदर्भात केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता..
जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाल्यास खाजगी वाहनाची मदत घेऊन मृतदेह त्या व्यक्तीच्या घरापर्यंत पोहोचवावा लागत होता. त्यामुळे शववाहिकेची नितांत आवश्यकता होती. त्यामुळे जिल्हा व तालुका स्तरावर शववाहीका असावी यासाठी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी राज्य सरकारकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार राज्यात १३२ शववाहिका मंजूर झाले असून त्यापैकी ३ शववाहिका बुलढाणा जिल्ह्याच्या वाट्याला आल्या आहेत. जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली या शववाहिका राहणार असून त्यातील एक शववाहिका जिल्हा सामान्य रुग्णालयात राहणार आहे..