

बुलडाण्यात तिघांचे अर्ज बाद! विजयराज शिंदे, सदानंद माळी, प्रशांत वाघोदेंचे अर्ज फेटाळले पण तरीही.....
Updated: Oct 30, 2024, 18:41 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलढाणा विधानसभा मतदारसंघासाठी २१ जणांनी ३० नामांकन अर्ज दाखल करण्यात आले होते. आज अर्ज छाननीच्या दिवशी त्यापैकी ३ अर्ज बाद करण्यात आले असून २७ अर्ज स्वीकारण्यात आले आहेत. भाजप नेते विजयराज शिंदे, सदानंद माळी आणि प्रशांत वाघोदे यांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत, मात्र तरीही तिघेही स्पर्धेत कायम आहेत...
विजयराज शिंदे यांनी एक अर्ज भारतीय जनता पक्षाच्या वतीने आणि दुसरा अपक्ष म्हणून भरला होता. भाजपच्या वतीने भरलेला अर्ज एबी फॉर्म नसल्याने रद्द करण्यात आला मात्र तरीही त्यांचा अपक्ष अर्ज स्वीकारण्यात आला आहे. सदानंद माळी यांनी एक अर्ज वंचित बहुजन आघाडी म्हणून तर दुसरा अपक्ष म्हणून भरला होता. वंचित बहुजन आघाडी म्हणून भरलेला अर्ज बाद ठरवण्यात आला आहे. प्रशांत वाघोदे यांचा एक अर्ज बाद झाला असून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने भरलेल्या त्यांचा अर्ज कायम आहे..अद्यापही २१ उमेदवार रिंगणात आहेत. ४ नोव्हेंबरला अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे..