काँग्रेसमध्ये जाऊन सत्ता उपभोगून आलेल्यांनी आम्हाला निष्ठा शिकवू नये! शिवसेना तालुकाप्रमुख सुरेशतात्या वाळूकार यांचा नरेंद्र खेडेकरांवर हल्लाबोल! म्हणाले, आम्ही विचारांचे पाईक....

 
 मेहकर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): ज्यांनी सत्तेसाठी काँग्रेसचे उंबरठे झिजवले..लाचारी पत्करून जिल्हा परिषदेची सत्ता भोगली त्यांनी आम्हाला निष्ठा शिकवू नये असा हल्लाबोल शिवसेनेचे मेहकर तालुकाप्रमुख सुरेश तात्या वाळूकर यांनी नरेंद्र खेडेकर यांच्यावर केला आहे. काल, महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा अर्ज भरतेवेळी नरेंद्र खेडेकर यांनी ना.जाधव आणि आ. रायमुलकर यांच्यावर आरोप केले होते.या आरोपांचा सुरेश तात्या वाळुकार यांनी खरपूस भाषेत समाचार घेतला आहे.

  मी उभ्या आयुष्यात काँग्रेस सोबत घरोबा करणार नाही असे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणायचे. मात्र तुम्ही तर स्व.बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली देत सत्तेची खुर्ची मिळवण्यासाठी काँगेससोबत गेलात. काँग्रेसकडून जिल्हा परिषदेची सत्ता भोगली..तुम्ही काय आम्हाला निष्ठा शिकवता?लोकसभा निवडणुकीत मते मिळवण्यासाठी तुम्हाला कुठे कुठे जावून माथा टेकवावा हे आम्हाला माहीत आहे.मतांसाठी एवढी लाचारी पत्करणारा कधीही शिवसैनिक होऊ शकत नाही असेही सुरेशतात्या वाळूकर म्हणाले. मेहकर विधानसभा मतदारसंघात तुम्हाला उमेदवार बाहेरून आणावा लागला.. उमेदवाराचा अर्ज भरण्यासाठी माणसेही बाहेरच्या मतदारसंघातून आणावी लागली असे म्हणत इथली जनता तुमच्या उमेदवाराला बाहेरचा रस्ता दाखवल्याशिवाय राहणार स्वस्थ बसणार नाही असेही सुरेशतात्या म्हणाले.

केंद्रीय मंत्री ना.प्रतापराव जाधव , आमदार डॉ. संजय रायमुलकर हे शिवसेनेचे खरे वैचारिक वारसदार आहेत. आम्ही शिवसेनेच्या विचारांचे पाईक आहोत. तुम्हीही कितीही खोटेनाटे आरोप केले तरी तुम्ही डॉ. रायमुलकर यांना विजयी होण्यापासून रोखू शकत नाही असे खडे बोलही सूरेशतात्या वाळूकर यांनी खेडेकर यांना सुनावले.