हा मोठ्या षडयंत्राचा भाग! व्हायरल पत्रावर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲड.नाझेर काझी स्पष्टच बोलले! म्हणाले, मनोज कायंदे हेच महायुतीचे अधिकृत उमेदवार...

 
 सिंदखेडराजा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सिंदखेडराजा मतदारसंघात सकाळपासून व्हायरल होत असलेल्या पत्रामुळे एकच खळबळ उडाली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीने सिंदखेडराजा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार डॉ.शशिकांत खेडेकर यांना पाठिंबा दिल्याचे व्हायरल पत्रात म्हटले होते..दरम्यान आता सदर पत्र फेक असल्याचे अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲड. नाझेर काझी यांनी म्हटले आहे. हा मोठ्या षडयंत्राचा भाग असल्याचे ॲड. नाझेर काझी यांनी म्हटले आहे.तसेच महायुतीचे अधिकृत उमेदवार मनोज कायंदे हेच असल्याचेही ॲड. नाझेर काझी यांनी म्हटले आहे...
   ॲड. नाझीर काझी म्हणतात...
  ॲड. नाझेर काझी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, आ. शिवाजीराव गर्जे साहेब, सरचिटणीस म.प्र. राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी, यांची बनावट स्वाक्षरी असलेले एक पत्र सध्या समाज माध्यमावर प्रसिध्द होत आहे. त्या प्रसिध्दी पत्रावर प्रदेशाध्यक्ष मा. श्री. सुनिल तटकरे साहेब यांचे सुचनेनुसार डॉ. शशिकांत खेडेकर यांना पाठिंबा जाहीर केल्याचा मजकुर लिहिलेला आहे.सदर पत्र बनावट आहे. एक मोठ्या षडयंत्राचा भाग आहे असे ॲड . काझी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
आजच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. अजितदादा पवार साहेब यांचा व्हिडिओ प्रसिध्द झालेला आहे. त्या व्हिडिओत त्यांनी महायुतीचे
अधिकृत उमेदवार श्री. मनोज देवानंद कायंदे यांना विजयी करण्यासंबंधि आवाहन
केले आहे. हाच मोठा पुरावा आहे. यावर अधिक बोलण्याची गरज नसल्याचेही ॲड.काझी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. महाराष्ट्र राज्याचे कृषि मंत्री मा. ना. श्री.धनंजय मुंढे साहेब यांनी देखील महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री. मनोज कायंदे यांना विजयी करण्यासंबंधि व्हिडिओव्दारे आवाहन केले आहे. याव्दारे मतदार बंधू-भगिनींना आवाहन करण्यात येत आहे की, महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री. मनोज देवानंद कायंदे हेच आहेत. मतदारांची दिशाभुल करण्याचे षडयंत्र रचल्या जात आहे. प्रसिध्द झालेल्या पत्राची कोणतीच दखल न घेता, विचलीत न होता पुर्ण ताकदीने श्री. मनोज कायंदे यांचे पाठिशी खंबीरपणाने उभे रहावे व त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करावे असे आवाहन पक्षाचा जिल्हाध्यक्ष म्हणून करीत असल्याचे ॲड. नाझेर काझी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे...