ही लढाई बुलडाणेकरांच्या अस्तित्वाची! भय - भ्रष्टाचाराच्याविरोधासाठी मैदानात; प्रेमलता सोनोनेंचे प्रतिपादन!मोताळा तालुक्यात गावभेट दौऱ्यांना मिळतोय उदंड प्रतिसाद!

  म्हणाल्या, जनतेचा प्रतिसाद देतोय विजयाची खात्री...

 
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा विधानसभा मतदारसंघाची लढाई नव्या वळणावर आलेली आहे. सुसंस्कृतपणाची, सज्जनशक्तीची ही लढाई अन्यायाविरोधात आहे, भ्रष्टाचारा विरोधात आहे, दडपशाही विरोधात आहे.. बुलडाणा विधानसभा मतदारसंघाला एका नव्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी मी कटिबध्द आहे असे प्रतिपादन स्वराज्य पक्षाच्या उमेदवार सौ.प्रेमलता सोनोने यांनी केले. मोताळा तालुक्यातील मूर्ती, वडगांव, बोराखेडी, सारोळा पीर, अंत्री या गावांमध्ये त्यांचा प्रचार दौरा संपन्न झाला. या प्रचार दौऱ्यांना अफाट असा जनप्रतिसाद मिळाला यावेळी मतदारांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या. 
  बुलडाणा विधानसभा मतदारसंघाची ओळख शांत सुसंस्कृत आणि सभ्य अशी आहे. मात्र गेल्या काही काळापासून ही ओळख पुसण्याचा प्रयत्न होत आहे, तो कुणाकडून झाला हे तुम्हाला वेगळे सांगण्याची गरज नाही असे त्या म्हणाल्या. बुलडाणा विधानसभा मतदारसंघात महिलेला प्रतिनिधित्व द्यावे अशी मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे केली होती मात्र त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. दुसऱ्या बाजूला साक्षात छत्रपती शिवरायांच्या घराण्यातील स्वराज्य पक्षाने आपल्या कार्याची दखल घेऊन उमेदवारी दिली ही माझ्यासाठी गौरवाची बाब आहे असेही प्रेमलता सोनोने म्हणाल्या. बुलडाणा विधानसभा मतदारसंघातील तमाम जनतेने आता परिवर्तनाचा निर्धार केलेला आहे, गावोगावी येणाऱ्या प्रचंड प्रतिसाद हा विजयाची ग्वाही देत असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला..२० नोव्हेंबरला सात किरणांसह पेनाची नीब या चिन्हा समोरील बटन दाबून आशीर्वाद देण्याची विनंतीही त्यांनी याप्रसंगी केली..