मशाल यात्रेत दिसतोय सरकारविरोधात आक्रोश....! जालिंधर बुधवंत म्हणाले,"हा फक्त ट्रेलर..पिक्चर अभी बाकी है!" असंवेदनशील सरकारची मस्ती जनताच उतरवणार...

 

मोतोळा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): राज्यातील खोके सरकारने असंवेदनशीलतेचा कळस गाठला आहे. हे सरकार गेंड्याच्या कातडीचे सरकार आहे. रोज शेतकरी मेला तरी यांना काही देणे घेणे नाही. उद्योगपतींच भलं करण्यासाठीच हे लोक खोके घेऊन सत्तेवर आलेले आहेत. त्यामुळे शेतमालाला भाव नाही, पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळाले नाहीत. पीक विमा कंपनीने मात्र हजारो कोटी रुपयांचा नफा जनतेच्या पैशातून कमावला आहे. जेवढा असंतोष या सरकारच्या विरोधात आहे, एवढा आतापर्यंत कधीही नव्हता..त्यामुळे या खोके सरकारची मस्ती विधानसभा निवडणुकीत जनता नक्की उतरवणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे असे रोखठोक प्रतिपादन शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवंत यांनी केले. मशाल जागर यात्रेच्या दुसऱ्या दिवशी मोतोळा तालुक्यातील विविध गावांत झालेल्या कॉर्नर बैठकांत बुधवंत बोलत होते..

  Budhvat
५ सप्टेंबर पासून शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवंत यांच्या नेतृत्वात बुलडाणा विधानसभा मतदारसंघात मशाल यात्रा निघाली आहे. २२ सप्टेंबर पर्यंत ही यात्रा मतदारसंघातील १५१ गावांचा प्रवास करणार आहे. २३ सप्टेंबरला बुलडाण्यात आक्रोश मोर्चाने या यात्रेचा समारोप होणार असून खा.अरविंद सावंत, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह बडे नेते या आक्रोश मोर्चाला उपस्थित राहणार आहेत. दरम्यान सध्या सुरू असलेल्या मशाल यात्रेला उस्फुर्त आणि अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. "हा फक्त ट्रेलर आहे पिक्चर अभी बाकी है " असेही बुधवंत यात्रेला मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दल म्हणाले..
यात्रेचा तिसरा दिवस असा...
मशाल जागर यात्रेचा आज,७ सप्टेंबरला तिसरा दिवस आहे. ही यात्रा सकाळी सहस्रमुळी, सहस्रमुळी तांडा त्यानंतर बोरखेड,साडेनऊ वाजता तारापूर, १० वाजता तरोडा, १०.३० वाजता बोरखेडी, ११ वाजता अंत्री, ११.३० वाजता पुन्हई तर दुपारच्या दुसऱ्या सत्रात ३.३० वाजता वडगाव खंडोपंत, ४ वाजता धोनखेड, ४.३० वाजता चावर्दा, ५ वाजता पिंप्री गवळी, ५:३० वाजता पोफळी असा यात्रेचा तिसरा दिवस राहणार आहे...