आली बाई... जयश्रीताई! बुलडाण्यात घुमला आवाज; जयश्रीताईंच्या नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी भरभक्कम गर्दी....
Oct 29, 2024, 13:29 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्रीताई शेळके आज,२९ ऑक्टोबरला आपला नामांकन अर्ज भरत आहेत. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव खा.मुकुल वासनिक, शिवसेनेच्या फायर ब्रँड नेत्या सुषमा अंधारे या सभेला संबोधित करणार आहेत.दरम्यान त्यासाठी बुलडाणा शहरात प्रचंड गर्दी उसळली आहे. जिजामाता प्रेक्षागार मैदानात जवळील टिळकनाट्य क्रीडा मंडळ मैदानात जाहीर सभेसाठी अतिविराट जनसागर उसळला असून "आली बाई - जयश्रीताई " अशा घोषणा देण्यात येत आहेत... जयश्रीताई समर्थकांच्या या घोषणांनी परिसर दणाणला आहे....