EXCLUSIVE सिंदखेडराजात वारं फिरतंय! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनंतर आता उद्या डॉ. डॉ.शशिकांत खेडेकरांसाठी पंकजाताई मुंडे यांची जाहीरसभा ! भाजप नेतृत्वाकडून भाजप कार्यकर्त्यांना योग्य तो संदेश.....

 
सिंदखेडराजा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सिंदखेडराजा मतदार संघात महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढत असली होत असली तरी महायुतीचे खरे आणि अधिकृत उमेदवार डॉ.शशिकांत खेडेकर हेच असल्याचे काल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देऊळगाव राजात जाहीर सभेत सांगितले. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या एका विधानाने संपूर्ण मतदारसंघात वारं डॉ. शशिकांत खेडेकर यांच्या बाजूने फिरल्याची चर्चा जोर धरत आहे..यातच आता या मतदारसंघातील जनतेवर प्रभुत्व असणाऱ्या लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांची जाहीर सभा डॉ. शशिकांत खेडेकर यांच्यासाठी उद्या,१२ नोव्हेंबरला सिंदखेडराजात राष्ट्रमाता जिजाऊंच्या राजवाड्यासमोर होणार आहे.त्यामुळे एक वेगळाच उत्साह संबंध मतदार संघात दिसत असून डॉ.शशिकांत खेडेकर यांचे बळ दहापटीने वाढले आहे. शिवाय या मैत्रीपूर्ण लढतील भाजप कार्यकर्त्यांनी कुणाची साथ द्यावी? असा संभ्रम काही कार्यकर्त्यांना निर्माण झालेला असताना भाजप नेतृत्वाने पंकजाताई मुंडे यांच्या सभेच्या निमित्ताने भाजप कार्यकर्त्यांना योग्य तो संदेश दिल्याची चर्चाही सुरू झाली आहे.
 सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या वतीने २५ वर्ष सत्ता उपभोगणारे डॉ. राजेंद्र शिंगणे विरुद्ध ५ वर्षांत विकासपुरुष अशी बिरुदावली मिरवणाऱ्या डॉ. शशिकांत खेडेकर यांच्यात प्रमुख लढत होत आहे. महायुतीच्या अजित पवार गटाकडून मनोज कायंदे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. दरम्यान महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या पेच प्रसंगात भाजप कार्यकर्त्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
अशातच आता भाजपच्या वरिष्ठ नेत्या आणि सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातील जनतेवर प्रभुत्व असणाऱ्या पंकजाताई मुंडे यांची जाहीर सभा डॉ. शशिकांत खेडेकर यांच्यासाठी होत आहे. पंकजाताईंच्या सभेमुळे सिंदखेडराजा मतदारसंघात खेडेकरांची ताकद चांगलीच वाढणार आहे..
निवडणुकीला सहज समजण्याचा प्रयत्न करणाऱ्या डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या अडचणी आता वाढणार आहेत. मनोज कायदे यांचा फटका महायुतीला बसेल असा महाविकास आघाडीच्या नेत्यांचा अंदाज असतांनाच उलटंच काहीतरी घडेल अशी चर्चा आता मतदारसंघात सुरू झाली आहे.. दरम्यान उद्या ,दुपारी १ वाजता जिजाऊंच्या राजवाड्यासमोर होणाऱ्या या जाहीर सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन महायुतीच्या वतीने करण्यात आले आहे..