वार फिरलयं..! बुलडाण्यात जयश्रीताईंच्या विजयासाठी महाविकास आघाडीची वज्रमूठ! प्रचार दौऱ्यांना उदंड प्रतिसाद! अंत्री, पुन्हई, सारोळा पीर, सारोळा मारोती गावांत मशालीचा जोर....
Nov 9, 2024, 14:13 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): काल बुलडाण्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जयश्रीताई शेळके यांच्यासाठी जाहीर सभा पार पडली. या सभेनंतर सबंध मतदार संघात वार फिरल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. जयश्रीताई शेळके यांचे काल उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत झालेले भाषण मतदारसंघात चर्चेचा मुद्दा बनले असून याला म्हणतात "डॅशिंग लीडरशिप" अशा प्रतिक्रिया अनेकजण व्यक्त करतांना दिसले. आज,९ नोव्हेंबरला मोताळा तालुक्यातील अंत्री, पुन्हई, सारोळा पीर, सारोळा मारोती या गावांत जयश्रीताईंचा प्रचार दौरा संपन्न झाला..यावेळी स्वागतासाठी गावोगावी जमलेली गर्दी, जयश्रीताईंसाठी देण्यात येणाऱ्या घोषणा वार फिरल्याची साक्ष देत होत्या ..
यावेळी गावकऱ्यांशी संवाद साधताना जयश्रीताई म्हणाल्या की, बुलडाणा विधानसभा मतदारसंघाला विकासाच्या नव्या उंचीवर पोहोचवण्यासाठी मी काम करणार आहे. केवळ हाताच्या बोटांवर मोजता येणाऱ्या लोकांना विकासाचा लाभ मिळणे ही काही विकासाची व्याख्या होऊ शकत नाही, या मतदारसंघात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक समाज घटकाला विकासाच्या योजनांचा फायदा मिळाला पाहिजे यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्या म्हणाल्या. या मतदारसंघात आता अरेरावी सहन केल्या जाणार नाही, जशास तसे उत्तर देण्यास आम्ही सक्षम आहोत असेही त्या म्हणाल्या. २० नोव्हेंबरला मशाल चिन्हासमोरील बटन दाबून विजयी करण्याची प्रांजळ विनंतीही जयश्रीताईंनी केली. महाविकास आघाडीचे पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.