बुलडाणा विधानसभा मतदारसंघात निष्ठेची मशाल पेटली! गावोगावी मिळतोय तुफान प्रतिसाद; जिल्हाप्रमुख बुधवंत म्हणाले,महाभ्रष्टाचारी सरकारचे दिवस कमी राहिलेत...
५ सप्टेंबर पासून बुलडाणा विधानसभा मतदारसंघात शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंधर यांच्या नेतृत्वात मशाल यात्रा सुरू आहे. २३ सप्टेंबरला बुलडाण्यात होणाऱ्या विराट आक्रोश मोर्चा ने या मशाल यात्रेचा समारोप होणार आहे. या आक्रोश मोर्चाला खा.अरविंद सावंत, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे संबोधित करणार आहेत. या आक्रोश मोर्चाचे निमंत्रणही मशाल यात्रेदरम्यान देण्यात येत आहे.
मशाल यात्रेचा आज ६ वा दिवस...
५ सप्टेंबरला मोताळा येथून ही मशाल यात्रा प्रारंभ झाली.गावोगावी मिळणारा प्रचंड प्रतिसाद, फटाक्यांच्या आतषबाजीने होणारे स्वागत यामुळे शिवसैनिकांमध्ये कमालीचा उत्साह संचारला आहे. आज,१० सप्टेंबरला या यात्रेचा ६ वा दिवस आहे. खामखेड, दाभा, नाईकनगर, नळकुंड, उबाळखेड, गुळभेली, रोहिणखेड, काळेगाव,तपोवन, सारोळापीर,
सारोळा मारोती आणि थड या गावांत आज मशाल यात्रा पोहचणार आहे.