सिंदखेडराजा तालुक्यात निष्ठेच्या "मशाली"ची हवा! मशाल यात्रेला अभूतपूर्व प्रतिसाद;उद्या "या" १२ गावांत येणार मशाल यात्रा...

 
सिंदखेडराजा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप वाघ यांच्या नेतृत्वात सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात उबाठा शिवसेनेची मशाल यात्रा दिमाखात सुरू आहे. १५ सप्टेंबर रोजी तेजस्वी महाराज संस्थान वरूडी येथून सुरू झालेली ही यात्रा सध्या सिंदखेडराजा तालुक्यातील गावागावांत जाऊन शेतकरी, कष्टकरी , जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम करत आहे. 
Advt
Advt.

 

आज,१८ सप्टेंबरला दुसरबीड, केशवशिवणी, तढेगांव, बारलिंगा, खैरव, वाकद, डोरव्ही, पोपळशिवणी, वाघाळा आणि मलकापूर पांग्रा या गावात मशाल यात्रेला अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला. प्रत्येक गावांत दिलीप वाघ यांनी शेतकरी, कष्टकरी जनतेच्या अडचणी समजून घेतल्या. प्रत्येक गावातील कॉर्नर बैठकीनंतर ही यात्रा पुढच्या गावात मार्गस्थ होत होती. दरम्यान आता उद्या,१९ सप्टेंबरला ही यात्रा १२ गावांत जाणार असल्याचे दिलीप वाघ यांच्या कार्यालयाकडून कळवण्यात आले आहे.
Advt
Advt.

 

   उद्या,१९ सप्टेंबरला सकाळी ८:३० वाजता सिंदखेडराजा तालुक्यातील जऊळका, ९:३० वाजता पिंपळगाव कुडा, १० वाजता लिंगा, ११ वाजता राहेरी,१ वाजता ताडशिवणी,१:३० वाजता देवखेड, २ वाजता रुम्हणा,३ वाजता खैरखेड, ३:३० वाजता ब्राम्हण सौदव,४ वाजता जांभोरा,५ वाजता गोकुळनगर,५:३० वाजता सोनोशी या गावांत मशाल यात्रा पोहचणार आहे. मशाल यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन तालुका प्रमुख महेंद्र पाटील यांनी केले आहे.