हिंदुत्वाचा लावूनी लाल टिळा..!बुलढाणा जिल्ह्यात महायुतीचीच हवा! काँग्रेसला भोपळा; मेहकर ने वाचवली महाविकास आघाडीची लाज....

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): विधानसभा निवडणुकीत बुलढाणा जिल्ह्यात महायुतीची हवा दिसत आहे. सातवी विधानसभा मतदारसंघात विजयाची केवळ औपचारिक घोषणा बाकी आहे. ७ पैकी ६ विधानसभा मतदारसंघ महायुतीकडे जाताना दिसत आहेत.. बुलढाण्यात संजय गायकवाड आणि जयश्री शेळके यांच्या काट्याची टक्कर झाली. त्यात लढतीत संजय गायकवाड यांनी विजयश्री खेचून आणली आहे. चिखलीत काट्याची टक्कर होईल अशी अपेक्षित असताना श्वेताताई महाले पाटील विजयाच्या उंबरठ्यावर आहेत. मेहकर ची जागा बुलढाणा जिल्ह्यात महायुती कडून सर्वाधिक खात्रीची समजल्या जात होती, मात्र इथे अनपेक्षित निकाल लागला असून महाविकास आघाडीचे सिद्धार्थ खरात यांनी महाविकास आघाडीची लाज वाचवली आहे. खामगाव, जळगाव जामोद, मलकापूर मध्ये भाजपचे उमेदवार विजयाच्या उंबरठ्यावर आहेत केवळ विजयाची औपचारिक घोषणा बाकी आहे... 
सर्वाधिक तुळशीची लढत सिंदखेड राज्यात होत असून इथे महायुतीचे मनोज कायंदे विरुद्ध डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्यात लढत होत आहे. सध्या मनोज कायदे आघाडीवर असून त्यांच्या विजयाची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे...