माता भगिनींचा जिव्हाळा देतो विकासकार्याचे बळ! आमदार श्वेताताईंचे प्रतिपादन! जन आशीर्वाद दौऱ्यात ओसंडून वाहतोय माता-भगिनींचा श्वेताताईंबद्दलचा जिव्हाळा
Updated: Nov 9, 2024, 13:37 IST
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)::त्या गावात येताच माय माऊल्यांचा घोळका त्यांच्या भोवती जमा होतो, वयोवृद्ध महिला तोंड भरून आशीर्वाद देतात, गृहिणी औक्षण करून ओवाळतात तर तरुणी शुभेच्छांचा वर्षाव करतात. एकूणच काय तर जमलेली प्रत्येक माता भगिनी ही त्यांच्या प्रति असलेला आपला जिव्हाळा आणि उत्कटता व्यक्त करत असते. हे चित्र आहे चिखली विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार आ. श्वेताताई महाले यांच्या जन आशीर्वाद दौऱ्यातील. या दौऱ्यादरम्यान श्वेताताईंना महिला मतदारांकडून मिळणारा उदंड आणि उत्स्फूर्त प्रतिसाद श्वेताताईंच्या विजयात महिला मतदारांचा सिंहाचा वाटा असेल हेच आवर्जून सांगत आहे. माता-भगिनींच्या या अतूट आणि अलोट प्रेमाची जाणीव श्वेताताईंना देखील असून त्याबद्दल त्यांच्या तोंडून निघणारे कृतज्ञतेचे उद्गार पाहता त्यांच्यात आणि महिला मतदारांमध्ये जुळलेले भावनिक ऋणानुबंध स्पष्टपणे जाणवतात.
महाराष्ट्र विधानसभेत चिखली मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्याची पुन्हा संधी मिळावी यासाठी आ. श्वेताताई महाले या महायुतीतर्फे भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार म्हणून सलग दुसऱ्यांदा जनतेचा कौल आजमावत आहेत. निवडणूक प्रचारानिमित्त आयोजित जन आशीर्वाद दौऱ्यातून मतदारसंघातील ग्रामीण भागात त्या सध्या फिरत असून प्रत्येक जिल्हा परिषद सर्कलमध्ये गावोगावी जाऊन मागील अडीच वर्षात आपण केलेल्या विकासकामांची पोचपावती श्वेताताई जनता जनार्दनाकडून मागत आहेत. अबालवृद्धासह प्रत्येक वयोगटातील मतदारांचा त्यांना उदंड प्रतिसाद लाभत असून यामध्ये महिला वर्गाचा दिसणारा उत्साह अधिक ठळकपणे जाणवतो.
" श्वेताताईंनी उतरवला आमच्या डोक्यावरचा हंडा " महिलांची बोलकी प्रतिक्रिया
गेल्या निवडणुकीत मतदारांनी दिलेल्या भरभरून आशीर्वादाचे ऋण चुकवण्यासाठी आ. श्वेताताई महाले यांनी कोट्यावधी रुपयांचा विकास निधी केवळ अडीच वर्षात चिखली मतदारसंघात आणला व त्याद्वारे जास्तीतजास्त विकासकामे केली. ग्रामीण भागातील महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरवण्यासाठी जलजीवन मिशनद्वारे सुमारे १०० गावांमध्ये कायमस्वरूपी पाण्याची व्यवस्था करण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्न महिला मतदारांना अतिशय भावला असून " आमच्या डोक्यावरचा हंडा उतरवणाऱ्या श्वेताताईंना आम्ही पुन्हा आमदार करणार " अशा शब्दात महिला मतदार आपली प्रतिक्रिया व्यक्त करतात.
लाडकी बहीण योजनेचाही जाणवतोय परिणाम
राज्यातील महायुती सरकारने महिला सक्षमीकरणाच्या भूमिकेतून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू केली चिखली मतदारसंघातील प्रत्येक पात्र महिला लाभार्थीला या योजनेचा लाभ मिळावा यासाठी आ. श्वेताताई महाले यांनी जे प्रयत्न केले ते खरोखरच उल्लेखनीय आहेत. त्यामुळेच या मतदारसंघातील ६० हजारापेक्षा जास्त महिलांना लाडकी बहीण योजनेमधून आर्थिक मदत मिळत आहे. ग्रामीण भागातील महिला मतदारांना श्वेताताईंनी केलेल्या या प्रयत्नांची जाण आहे; म्हणूनच ज्या ज्या गावात श्वेताताई जातात तेथे त्यांचे स्वागत करण्यासाठी सर्वात पुढे माता भगिनी असतात. आमच्यासाठी झटणाऱ्या श्वेताताईंनाच आम्ही पुन्हा संधी देणार, आमच्यासह आमच्या संपूर्ण कुटुंबाचे मतदान करून विधानसभेत पाठवणार असा निर्धार ग्रामीण भागातील महिला मोठ्या संख्येने व्यक्त करताना जन आशीर्वाद दौऱ्यात पाहायला मिळतात.
माता भगिनींचा जिव्हाळा देतो मला विकासकार्याचे बळ - श्वेताताई महाले
मातृत्व, कर्तुत्व आणि नेतृत्व यांचा त्रिवेणी संगम म्हणजे नारीशक्ती होय. याच नारीशक्तीचा एक अंश म्हणून मी चिखली मतदारसंघाचे प्रतिनिधित्व राज्याच्या विधानसभेत करत आहे. या माध्यमातून मला माझ्या परिसराचा विकास करण्याची संधी मिळाली असून या संधीमध्ये महिला मतदारांचा मोठा सहभाग असल्याची मला जाणीव आहे. या जाणिवेपोटी ग्रामीण भागातील बहुजन समाजातील माझ्या आई बहिणींच्या प्रत्येक मागणीची दखल घेणे हे मी माझे कर्तव्य समजते. महिलांचे शिक्षण व आरोग्य हे माझ्यासाठी प्राधान्याचे मुद्दे असून महिला सक्षमीकरणासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहे त्या त्या करण्याचे प्रयत्न मी करत राहणार आहे. माझ्या या कार्याची दखल घेऊन घेणाऱ्या आणि माझ्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या माता भगिनींचा जिव्हाळा मला अधिक विकासकार्य करण्याचे प्रेरणा देतो असे भावोद्गार आ. श्वेताताई महाले या आपल्या महिला मतदारांबद्दल काढतात.