भुमिपुत्रांची आरोग्य सेवा राजमाता जिजाऊ चरणी ... ! १२ जानेवारीला भक्तांच्या सेवेसाठी सिदखेडराजा येथे उभारला विशेष वैद्यकीय सेवा मदत कक्ष; आरोग्य शिबीराचेही आयोजन ....!!
Updated: Jan 11, 2025, 10:27 IST
सिदखेडराजा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): राष्ट्रमाता जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त हजारो भक्त सिदखेडराजा नगरीत येतात. जिजाऊ भक्तांच्या आरोग्य सुविधेसाठी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या संकल्पनेतून विशेष वैद्यकीय सेवा मदत कक्ष आणि आरोग्य तपासणी व रोगनिदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
![Advt](https://buldanalive.com/static/c1e/client/91497/uploaded/cd1a9154171db3f7921a0f469ae55f37.jpg)
राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच जन्मस्थळ असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील सिदखेडराजा येथील राजे लखुजीराजे जाधव यांच्या राजवाडा येथे जिजाऊ जन्मोत्सवानिमीत्य मॉ जिजाऊ साहेबांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी राज्यभरातून हजारो भक्त १२ जानेवारीला सिदखेड राजा नगरीमध्ये येत असतात. आरोग्यसेवा हीच ईश्वरसेवा समजुन भक्तगणांच्या आरोग्य सुविधेसाठी केंद्रीय आरोग्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या संकल्पनेतून विशेष वैद्यकीय सेवा मदत कक्ष आणि आरोग्य शिबिराचा आयोजन सिदखेडराजा येथील जिजाऊ विद्यालयामध्ये करण्यात आले आहे . या शिबिराचे उद्घाटन १२ जानेवारीला सकाळी ९ वा केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते होणार आहे.
![Advt](https://buldanalive.com/static/c1e/client/91497/uploaded/1291d59593fb5c725dd89348f64fe96b.jpg)
या कार्यक्रमाला कामगार मंत्री आकाश फुंडकर, आमदार मनोज कायंदे, माजी आमदार शशिकांत खेडेकर, जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील, जिल्हा परिषदेचे सी ई ओ गुलाबराव खरात ,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ भागवत भुसारी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अमोल गिते, शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा . बळीराम मापारी , युवा सेना जिल्हाप्रमुख ऋषीभाऊ जाधव, महिला आघाडी प्रमुख मायाताई म्हस्के, अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष शेख सिद्धीकी, शिवसेना उपजिल्हाप्रमुख बाबुराव मोरे, संपर्कप्रमुख शिवप्रसाद ठाकरे, माजी नगराध्यक्ष सतीश तायडे, शिवसेना तालुका प्रमुख वैभव देशमुख, शहर प्रमुख बालाजी मेहेत्रे उपस्थित राहणार आहे याशिबिरत अस्थिरोग तज्ञ, कान नाक घसा , मूत्रपिंड व मूत्रमार्ग विकार तज्ञ , कार्करोग तज्ञ बालरोग तज्ञ , पोटाचे विकार तज्ञ कर्करोग तज्ञ, मानसिक आजार तज्ञ , हृदयरोग तज्ञ ,मेदु तपासणी आणि नेत्र तपासणी सोबतच मोफत चष्मे आणि औषधीचे वाटप करण्यात येणार आहे. या शिबीरत तज्ञ डॉक्टर रुग्णाची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. या आरोग्य शिबीराचा लाभ गरजू रुग्णांनी घ्यावा असे आवाहन शासकीय रुग्णालय आणि शिवसेना, युवा सेना ,महिला आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे ..