महायुती सरकारला सरकार जाण्याची भीती म्हणून निवडणुका लांबवण्याचा प्रयत्न! शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवंत यांचा घणाघात
शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवंत यांच्या नेतृत्वात ५ सप्टेंबर पासून बुलडाणा विधानसभा मतदारसंघात मशाल यात्रा निघाली आहे. तब्बल १५१ गावांत ही मशाल यात्रा जाणार असून २३ सप्टेंबरला बुलडाण्यात आक्रोश मोर्चाने या यात्रेचा समारोप होणार आहे.
दरम्यान आतापर्यंत ही यात्रा जवळपास ११० गावांत पोहचली आहे. १३ सप्टेंबरला ही यात्रा मोताळा तालुक्यातून घाटावर अर्थात बुलडाणा तालुक्यात आली. तराडखेड येथून या यात्रेला दिमाखात प्रारंभ झाला, गावागावात होणारे यात्रेचे जंगी स्वागत, प्रत्येक गावातील कॉर्नर मीटिंग यामुळे दिवसभर शिवसैनिकांत उत्साह होता, सायंकाळच्या सत्रात येळगाव, रुइखेड टेकाळे, सव आणि खेर्डी गावातील स्वागत आणि सभा दिमाखदार झाल्या. या सभांमधून जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवंत यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला..
आज यात्रा या गावांत...
दरम्यान आज,१४ सप्टेंबरला ही मशाल यात्रा बुलडाणा तालुक्यातील १७ गावांत जाणार आहे. सकाळी ८ वाजता डोंगरखंडाळा, ८.३० वाजता वरवंड, ९.३० वाजता भादोला, १० वाजता पोखरी, १०.४५ वाजता माळविहीर, ११ वाजता सावळा, १२ वाजता सुंदरखेड, १२.३० वाजता अजिसपूर, १ वाजता नांद्राकोळी, ३.३० वाजता सागवण, ४ वाजता कोलवड, ४.४५ वाजता अंभोडा, ५.१५ वाजता वाजता हतेडी खुर्द, ५.३० वाजता हतेडी बु, ६ वाजता तांदुळवाडी, ६.३० वाजता उमाळा आणि सायंकाळी ७ वाजता देऊळघाट असा यात्रेचा प्रवास असणार आहे. या मशाल यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे शिवसेना तालुका प्रमुख लखन गाडेकर यांनी केले आहे.