जयश्रीताईं शेळकेंसाठी "डबल एस" फॉर्मुला महत्त्वाचा! सुनील शेळकेंमुळे ताईंच्या पाठीशी मोठी ताकद....

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): प्रशासकीय कारकिर्दीमध्ये आपलेपणाने वागत आलेल्या प्रत्येकाचे काम पूर्णत्वाकडे नेण्याचे साध्य नेहमीच जपणारे सुनील शेळके हे महसूल विभागातील मोठे नाव. त्यांनी सेवानिवृत्ती घेतली आणि जिल्ह्यातील युवकांच्या रोजगारासाठी महानगरामध्ये जाऊन कंपन्या काढल्या. या कंपन्यांच्या परिघात हजारो लोकांना काम मिळत आहे. उपजिल्हाधिकारी पदावरून सेवानिवृत्ती घेतलेले आणि व्रतस्थपणाने वागणारे सुनील शेळके अर्थात "डबल एस" फॉर्मुला जयश्रीताई सुनील शेळके यांच्यासाठी मोलाचा ठरत आहे.
   
 
सामाजिक चळवळीच्या माध्यमातून सुनील शेळके कायम सक्रिय राहिले. सिंदखेडराजा येथील जिजाऊ सृष्टीवर हेलिकॉप्टरच्या माध्यमातून पुष्पवृष्टी करणे असो वां शेतकऱ्यांच्या हितासाठी कृषी प्रदर्शनीचे नियोजन असो..अशा विविध कामांत ते कायम अग्रेसर राहिले. त्यांच्या सुविद्य पत्नी अर्थातच बुलडाणा विधनसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या विद्यमान उमेदवार जयश्रीताई शेळके यांच्या पाठीशी भक्कमपणे त्यांनी ताकद उभी केली. वैचारिक पातळीवर त्यांना विचारपिठाचे रस्ते दाखवत प्रगतीचा मार्ग प्रशस्त केला. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो असं नेहमीच म्हटलं जातं. मात्र जयश्रीताई शेळके यांचं व्यापक व्यक्तिमत्व घडवण्यामध्ये सुनील शेळके यांचा मोठा हातभार आहे.
बचत गट फेडरेशनच्या माध्यमातून हजारो महिलांचे संघटन आज जयश्रीताई शेळके यांनी जिल्हाभरात उभे केले आहे.
राजकारणामध्ये सक्रिय झाल्यापासून त्यांचा अभ्यासू आणि संयमीपणा दिसून आलेला आहे. असे असतानाही पोलिसीबळाचा वापर आंदोलन दडपण्यासाठी होत असताना "खूप लडी मर्दानी "चा प्रत्यय सुद्धा जयश्रीताई यांनी बुलडाणा शहरात झालेल्या आंदोलनात दाखवून दिला होता. सुनील शेळके यांनी नायब तहसीलदार, तहसीलदार ,उपजिल्हाधिकारी, मंत्री महोदयांचे ओएसडी म्हणून प्रशासकीय काम करताना आपलेपणाची भावना कायम जपली. जिल्हा मुख्यालयाच्या बुलडाणा शहरात जिल्हाभरातून आलेल्या, गाव गाड्यात माणसाच्या प्रश्नांना थेट हात घालण्याचे त्यांचे कसब आणि प्रशासकीय वर्तुळामध्ये जपलेला गोतावळा हा नक्कीच मोठा आहे. मोताळा तालुक्यामध्ये महसूल प्रशासनाबद्दल असलेला मोठा रोष सुनील शेळके यांच्या कार्यकाळामध्ये कमी करण्यात त्यांना यश आले होते. विशेष म्हणजे लोकप्रिय अधिकारी म्हणून ते या भागात आपल्या कामांमुळे चर्चेत राहिले. साहजिकच त्यावेळी केलेली "साखर पेरणी" म्हणा किंवा चांगल्या कामाचा परिणाम म्हणा जयश्रीताई शेळके यांच्यासाठी सुनील शेळके या नावाचा "डबल एस" फार्मूला हा महत्त्वाचा ठरतो आहे....