कार्यकर्त्यांचा निर्धार...पुन्हा श्वेताताईच आमदार! सवणा जिल्हा परिषद सर्कलमधील कार्यकर्त्यांचा मेळावा जल्लोषात! आमदार श्वेताताई म्हणाल्या...
Updated: Oct 19, 2024, 21:19 IST
चिखली(ऋषी भोपळे:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले यांनी निवडणुकीच्या तयारीत चांगलीच आघाडी घेतली आहे. मतदारसंघातील सर्वच जिल्हा परिषद सर्कलनिहाय कार्यकर्ता व पदाधिकारी मेळाव्यांना उदंड प्रतिसाद मिळतो आहे. पुन्हा एकदा श्वेताताईच आमदार असा निर्धार कार्यकर्त्यांनी केला असून त्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्यात येत आहे. सवणा येथे झालेला कार्यकर्ता मेळावाही दमदार असाच झाला..कार्यकर्ता मेळाव्यातील पदाधिकाऱ्यांची भाषणेही स्फुरण चढवणारी होती..आमदार श्वेताताई महाले यांच्या भाषणादरम्यान वाजणाऱ्या टाळ्या सर्व काही सांगत होत्या..अलीकडील दोन वर्षेच कामासाठी मिळाली तरी देखील हजारो कोटी रुपयांचा निधी मतदार संघासाठी आणला..पुढच्या ५ वर्षात संपूर्ण बहुमताचे सरकार आल्यानंतर चिखलीच्या सर्वांगसुदंर असा विकास करू असा शब्द यावेळी आमदार श्वेताताईंनी आपल्या भाषणातून दिला..
यावेळी बोलतांना आमदार श्वेताताईंनी सवणा जिल्हा परिषद सर्कल मध्ये केलेल्या विकास कामांचा पाढा वाचला.
सवणा हे एक मोठे गाव असून गावामध्ये अनेक वर्षांपासून विकास नव्हता. आमदार झाल्यानंतर गावांमध्ये जलजीवन मिशन, पैनगंगा नदीवरील अत्यंत महत्त्वाचा पूल त्यासाठी आपण साडेचार कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणल्याचे त्या म्हणाल्या. गावातील अंतर्गत रस्ते, सभामंडप, छत्रपती शिवाजी महाराज, हिंदूसूर्य महाराणा प्रताप यांच्या स्मारकाचे सौंदर्यीकरण करण्यासाठी निधी मंजूर केला व कामही पूर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले. सर्कल मधील दुसरे मोठे गाव किन्होळा गाव देखील विकासापासून वंचित होते. पण या महायुतीच्या सरकारच्या काळामध्ये या गावांमध्ये विकासाची अनेक कामे झाली.
अल्पसंख्याक समाजासाठी शादीखाना, मागासवर्गीय समाजासाठी समाजभवन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे सौंदर्यीकरण, विविध समाजासाठी स्मशानभूमी, गावातील अंतर्गत रस्ते अशी अनेक विकासकामे पूर्ण करण्याचे काम प्रमाणिकपणे केल्याचे श्वेताताईंनी सांगितले. सर्कलमधील प्रत्येक गावात जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठ्याच्या योजना मंजूर केल्या, पर्यटन अंतर्गत धार्मिक स्थळांना कोट्यवधी रुपयाचा निधी मंजूर करून दिला.
गाव जोडणी रस्ते, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून ही सर्व कामे प्रगतीपथावर आहेत. मागासवर्गीय समाज बांधवांसाठी विविध विकासकामे मंजूर केले. सर्कल मधील प्रत्येक समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. अगदी छोट्याशा गावात सुद्धा कोट्यवधी रुपयाचा निधी देऊन विकासापासून वंचित असलेल्या गावांना विकास काय असते हे दाखवून दिले. ग्रामीण मार्ग जोडून गाव खेड्यांना शहराच्या दळणवळणाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या.
युवकांसाठी व्यायामशाळा, क्रीडांगण अशा भौतिक सुविधा निर्माण केल्या. आन्वी येथे वीस कोटी रुपयांचा सोलर पार्क उभारून या भागातील शेतकऱ्यांचा विजेचा प्रश्न कायमस्वरूपी मिटवला. महायुती सरकारच्या कामगार योजना, लाडकी बहीण योजना अशा विविध योजनांचा लाभ नागरिकांना व महिला भगिनींपर्यंत पोहोचवण्यासाठी गावोगावी उपक्रम आयोजित करून त्यांना लाभ मिळवून दिल्याचे आमदार श्वेताताईंनी सांगितले. आपल्या मतदानाचे ऋण फेडण्यासाठी मी अहोरात्र प्रयत्न केले आणि भविष्यात देखील करत राहणार असा शब्द यावेळी आमदार श्वेताताईंनी दिला.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, बूथ प्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते..