काँग्रेसला आता संविधानाचा खोटा पुळका आलाय! काँग्रेसकडून मतांसाठी संविधान आणि बाबासाहेबांच्या नावाचा वापर!

 भाई विजय गवईंचे भाषण ठरले वादळी; म्हणाले, आता श्वेताताईंना मंत्रिमंडळात पहायचेय...
 
 चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखली विधानसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार श्वेताताई महाले पाटील यांनी काल, २८ ऑक्टोबरला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. राजा टॉवर चौकात यावेळी प्रचंड सभा झाली..या सभेत पिरिपा चे जिल्हाध्यक्ष भाई विजय गवई यांचे भाषण चांगलेच गाजले.आपल्या वादळी भाषणात त्यांनी काँग्रेसचा खरपूस समाचार घेतला. काँग्रेसने आतापर्यंत संविधान आणि बाबासाहेबांच्या नावाचा गैरवापर केलाय असा घणाघाती आरोप त्यांनी केला..

आपल्या छोटेखानी भाषणात भाई विजय गवई यांनी महायुतीच्या अधिकृत उमेदवार श्वेताताई महाले यांच्या कामाचे कौतुक केले. श्वेताताई महालेंनी चिखली विधानसभा मतदारसंघासाठी कोट्यावधी रुपयांची विकास कामे केली.

आता पुन्हा श्वेताताईंना प्रचंड बहुमतांनी विजयी करायचे असून आता महायुती सरकारमध्ये श्वेताताईंना मंत्रिमंडळात पहायचे आहे असे भाई विजय गवई म्हणाले. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील एनडीए सरकार संविधान बदलणार म्हणून काँग्रेसने फेक नरेटीव्ह तयार केला. मात्र आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संविधानाला प्रणाम करूनच कामाला सुरुवात केली.

नरेंद्र मोदींसारखा दूरदृष्टीचा नेता आपल्याला लाभला आहे. याउलट काँग्रेसने बाबासाहेबांना हयातभर त्रासच दिला आहे. ज्या काँग्रेसने हयातीत बाबासाहेबांना भारतरत्न दिला नाही तेच काँग्रेसवाले आता संविधानाचा खोटा पुळका घेऊन बाहेर निघाले आहेत. काँग्रेस मतांसाठी संविधान आणि बाबांसाहेबांच्या नावाचा वापर करत असल्याचा हल्लाबोलही त्यांनी केला..