डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरला सोहळा; चिखलीत १५३८ कोटी रुपयांच्या कामाचे भूमिपूजन; ना.रक्षाताई खडसे म्हणाल्या श्वेताताईंच्या मागे आशीर्वादरुपी पाठबळ असूद्या!

ना.जाधव म्हणाले, कामांची पावती विधानसभा निवडणुकीत मिळणार! आ. श्वेताताई म्हणाल्या, हा माझ्या स्वप्नपूर्तीचा क्षण....

 
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्यात महायुतीच्या सरकारने सर्वसामान्य जनतेच्या सुख सुविधेसाठी मोठ्या प्रमाणात विकास कामे व कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करत आहे. या सर्व योजनांचे लाभ चिखली मतदारसंघात आ. श्वेताताई महाले ह्या अतिशय प्रभावीपणे पोहोचवत असल्याने आगामी काळात चिखली हा विकसित मतदारसंघ म्हणून निश्चितच ओळखला जाईल व यासाठी पुन्हा एकदा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत श्वेताताईच्या मागे आपले आशीर्वाद रुपी पाठबळ असूद्या, असे आवाहन केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी केले. आ. श्वेताताई महाले यांच्या पाठपुराव्यातून मंजूर झालेल्या चिखली शहरातील नळ योजना व हॅम आणि ए. बी. डी. अंतर्गत रस्त्यांची कामे अशा एकूण १५३८ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांच्या भूमिपूजन व लोकार्पण कार्यक्रमाच्या उद्घाटक म्हणून ना. रक्षाताई खडसे बोलत होत्या. केंद्रीय आयुष्य मंत्री प्रतापराव जाधव या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते. याप्रसंगी मंचावर आ. श्वेताताई महाले बुलढाण्याचे माजी आमदार विजयराव शिंदे यांच्यासह महायुतीतील विविध पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रबद्ध नियोजन, फेटे घातलेल्या हजारो महिल्या आणि तुडूंब गर्दी यामुळे हा सोहळा डोळ्यांचे पारणे फेडणारा असाच ठरला..

Mahale
अमृत २.० तथा महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरउठाण अभियान योजनेअंतर्गत १३२ कोटी रुपये
किमतीच्या चिखली शहरातील पाणीपुरवठा योजनेचे
भूमिपूजन, EDB अंतर्गत चिखली तालुक्यातील
पारध - धामणगाव धाड सावळी साकेगाव चिखली रा. म. २१४ रस्त्याची सुधारणा करणे,
१४३/५०० ते १३२/५००, किंमत ३११ कोटी ६५
लक्ष रुपये, हॅम अंतर्गत चिखली तालुक्यातील चौथा -गिरडा रोड प्रजिमा २१ किमी, ४८/५०० ते ५२/५०० तसेच दुधा माळवंडी- केसापूर पांगरी- केळवद- किन्होळा- धोडप रोड रा. म. ४४१ ०/०० ते३५/५००, लांबी ३९.५०० किमी रस्त्याची सुधारणा करणे, किंमत ३८४ कोटी ५८ लक्ष रुपये, हॅम अंतर्गत धोडप- पेठ- एकलारा- अंबाशी- चंदनपूर मेरा राहेरी बु. रा. म. ४३९, ०/०० ते ३२/०० ची सुधारणा करणे (ता. चिखली, जि. बुलढाणा), किंमत ३११ कोटी ६८ लक्ष रुपये, EDB अंतर्गत चिखली तालुक्यातील अमडापूर -जानेफळ - लोणी गवळी- घाटबोरी जनुना पांगरखेड बेळगाव-केनवड ते रा. म. ७५३,०/०० ते४८/९०० रस्त्याची सुधारणा, लांबी ४८.९०० किमी, किंमत ३९१ कोटी ७१ लक्ष रुपये या कामांचे भूमिपूजन व लोकार्पण काल पार पडले. 
Mahale
यावेळी अध्यक्ष स्थानावरून बोलताना केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी राज्यातील प्रत्येक मतदारसंघात हजारो कोटी रुपयांचे विकासकामे सुरू असून ही किमया केवळ महायुती सरकार सत्तेवर आल्यामुळे शक्य झाली असे मत व्यक्त केले. संविधान बदलाचे फेक नॅरेटिव्ह चालवणाऱ्यांना केंद्र व राज्य सरकारने आपल्या विकास कामांमधून व शेतकऱ्यांच्या कल्याणकारी निर्णयांमधून चोख प्रत्युत्तर दिले, राज्य सरकारने केलेल्या कल्याणकारी कार्याची पावती जनता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत नक्कीच देईल असा विश्वास ना.प्रतापराव जाधव यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. 
भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. प्रतापसिंह राजपूत शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रामकृष्णदादा शेटे, शिवसेना तालुकाप्रमुख गजानन मोरे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शंतनु बोंद्रे, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष विजय गवई, शिवसेना महिला आघाडीच्या मायाताई म्हस्के, भाजपा शहराध्यक्ष पंडितराव देशमुख, चिखले तालुकाध्यक्ष सुनील पोफळे बुलढाणा तालुका अध्यक्ष एड. मोहन पवार, ज्येष्ठ नेते रामदासभाऊ देव्हडे, माजी नगराध्यक्ष सुहास शेटे, जिल्हा सचिव कृष्णकुमार सपकाळ, अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हाध्यक्ष शेख अनीस, भाजपा सांस्कृतिक सेलचे जिल्हाध्यक्ष श्याम वाकदकर, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष सुदर्शन खरात, यांच्यासह महायुतीतील पदाधिकारी यावेळी मंचावर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्याम वाकतकर, अनंत आवटे यांनी केले.
   चिखली शहराची पाणी समस्या सोडवल्याबद्दल शहरातील माता भगिनींच्या वतीने पुष्पहार घालून आ. श्वेताताई महाले यांचा यावेळी सत्कार करण्यात आला तसेच महाराष्ट्र बांधकाम कामगार मंडळाच्या संसार उपयोगी भांड्यांच्या वितरण देखील या कार्यक्रम प्रसंगी लाभार्थ्यांना करण्यात आले मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. 
आज माझ्या स्वप्नपूर्तीचा क्षण आ. श्वेताताई महाले 
बालपणापासून आजवर मी चिखली शहराची पाणीटंचाई स्वतः अनुभवली आहे, त्यामुळे एक चिखलीकर म्हणून या समस्येचे निवारण करण्याचा मी मनोमन निर्धार केला होता. मतदारसंघाची आमदार या नात्याने चिखलीकरांना या समस्येतून कायमचे मुक्त करण्यासाठी मी सर्व शक्तीनिशी प्रयत्न केले. त्याचे फळ म्हणून आज १३२ कोटी रुपयांच्या या पाणीपुरवठा योजनेचे होत असलेले भूमिपूजन हा माझ्या स्वप्नपूर्तीचा क्षण आहे, असे भावनिक उद्‌गार आ. श्वेताताई महाले यांनी काढले
उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा व्हिडिओ संदेश 
आज झालेल्या चिखली शहराच्या पाणीपुरवठा योजनेच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः उपस्थित राहणार होते. परंतु, पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे त्यांना या कार्यक्रमाच्या निमंत्रणाचा स्वीकार करणे शक्य झाले नाही. त्यामुळे फडणवीस यांनी एका व्हिडिओ संदेशाद्वारे आपल्या शुभेच्छा व मनोगत व्यक्त केले. या व्हिडिओची चित्रफित सदर कार्यक्रमात प्रदर्शित करण्यात आली. आपल्या शुभेच्छा संदेशात उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी आ. श्वेताताई महाले यांच्या विकासकार्याचे तोंड भरून कौतुक केले...