BREAKING जिल्ह्याला पालकमंत्री मिळाले हो; बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री राष्ट्रवादीचे मकरंद पाटील! फुंडकरांना अकोल्याचे पालकमंत्री पद!
Jan 18, 2025, 21:19 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा जिल्ह्याला पालकमंत्री म्हणून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मकरंद पाटील यांना जबाबदारी देण्यात आली आहे. खामगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांना जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळेल अशी अपेक्षा असताना ती अपेक्षा मात्र फोल ठरली.. आकाश फुंडकर यांना अकोल्याचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.
मकरंद जाधव पाटील हे सातारा जिल्ह्यातील वाई विधानसभा मतदारसंघातून अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीकडून आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांच्याकडे राज्याच्या मदत व पुनर्वसन खात्याची जबाबदारी आहे..