BIG BREAKING बुलडाण्यात तणाव... आमदार संजय गायकवाड समर्थकांची नवी खेळी; काँग्रेसच्या आंदोलनाला विरोध....
Updated: Sep 20, 2024, 17:02 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलढाणा येथील जयस्तंभ चौकात आज काँग्रेस कडून आंदोलनाचे नियोजन करण्यात आले होते. मात्र त्यापूर्वीच आमदार संजय गायकवाड यांच्या समर्थकांकडून
या आंदोलनाला विरोध करण्याचा मोठा प्लॅन रचण्यात आला आहे.आंदोलन होऊ देणार नाही अशी भूमिका आमदार संजय गायकवाड समर्थकांनी घेतली आहे.
काँग्रेसच्या वतीने जयस्तंभ चौकात आंदोलनाचे नियोजन करण्यात आले होते. सध्या दंगा काबू पथक आणि अतिरिक्त पोलीस बंदोबस्त मागवण्यात आला असून परिस्थिती नियंत्रणात आहे.