BREAKING सावरगाव डुकरे गावात तणाव! काँग्रेस भाजप आमने-सामने; दोन्हीकडून प्रचंड घोषणाबाजी...

 
चिखली

 चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखली तालुक्यातील सावरगाव डुकरे गावात गेल्या तीन दिवसांपासून काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे व दुसऱ्या बाजूला भाजपचे संतोष काळे यांच्यासह अन्य दोघांचे उपोषण सुरू होते. आज दोघांच्याही अन्न त्याग आंदोलनाचा तिसरा दिवस होता.दरम्यान राहुल बोंद्रे यांच्या अन्नत्याग आंदोलनाला भेट देण्यासाठी आज प्रदेश काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे सकाळीच पोहोचले.

शेतकऱ्यांच्या स्वाक्षरीचे निवेदन राज्यपालांनाच द्यायचे असे ठरवत माणिकराव ठाकरे यांच्या हस्ते राहुल बोंद्रे यांनी अन्नत्याग आंदोलन मागे घेतले. यावेळी मोठ्या प्रमाणात काँग्रेस कार्यकर्त्यांची फौज गावात जमली होती. भाजप कार्यकर्त्यांचेव आंदोलन राहुल बोंद्रे यांच्या अन्नत्याग आंदोलनस्थळापासून अवघ्या काही मीटर अंतरावर होते.. यावेळी दोन्ही बाजूंनी प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली..

राहुल बोंद्रे कार्यकर्त्यांसह भाजपच्या अन्नत्याग आंदोलनास्थळासमोरून जात होते.यावेळी दोन्ही बाजूंनी प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे मोठे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. चिखली पोलीस स्टेशनचे ठाणेदार संग्राम पाटील यांनी कसरत करून परिस्थिती नियंत्रणात आणली असून अद्यापही संतोष काळे पाटील यांचे अन्नत्याग आंदोलन सुरू आहे.