"ताई" आल्या अन् स्वागताला बहिणी धावल्या..! गावोगावच्या भेटी-गाठींत श्वेताताईंचा मायमाऊल्यांना शब्द! म्हणाल्या..महायुती सरकारच लाडकी बहीण योजना सुरू ठेवेल...
Oct 23, 2024, 19:11 IST
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखली विधानसभेसाठी भाजपने विद्यमान आमदार श्वेताताई महाले पाटील यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे. २८ ऑक्टोबरला श्वेताताई उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्या तरी सध्या भेटीगाठींवर त्यांनी जोर दिलेला आहे. अतिशय नियोजनबध्द पद्धतीने श्वेताताईंची प्रचार यंत्रणा कामाला लागली आहे. गावो-गावच्या भेटीगाठी दौऱ्यांना प्रचंड प्रतिसाद मिळत असून ज्या गावात श्वेताताई जात आहेत त्या गावात श्वेताताईंच्या स्वागतासाठी अख्खे गाव एकत्र येत आहे. विशेष म्हणजे लाडक्या बहिणी श्वेताताईंच्या स्वागतासाठी पुढे सरसावत आहे..ताई आल्या अन् बहिणी स्वागताला धावल्या असे एकंदरीत चित्र गावोगावी आहे...
आज,२३ ऑक्टोबरला चांधई तवर, धोडप, पळसखेड सपकाळ, करवंड, धोत्रा भणगोजी, आंधई, शिंदी हराळी या गावांत महायुतीच्या अधिकृत उमेदवार श्वेताताई महाले यांच्या गावभेट दौऱ्यांना उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. ज्येष्ठांचे आशीर्वाद, भेटी-गाठी असे करत श्वेताताई गावोगावी जात आहेत. प्रत्येक गावात लाडकी बहीण योजनेबद्दल अनेक भगिनी श्वेताताईजवळ महायुती सरकारबद्दल धन्यवाद व्यक्त करीत आहेत. याप्रसंगी बोलताना श्वेताताई म्हणाल्या की, लाडकी बहीण योजना बंद करण्यात येणार असल्याची अफवा महाविकास आघाडी कडून पसरविण्यात येत आहे. मात्र हे निव्वळ खोटे आहे. पराभवाची चाहूल महाविकास आघाडीला लागली आहे. लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारची अतिशय महत्त्वकांक्षी योजना आहे.. जोपर्यंत महायुती सरकार आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही असे श्वेताताई माय- माऊल्यांशी चर्चा करताना म्हणाल्या....