केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांचा यशस्वी पाठपुरावा! जिल्ह्यात ६ ब्लॉक पब्लिक हेल्थ युनिट आणि ३४ प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी २३ कोटींच्या निधीला मंजुरात..
Mar 11, 2025, 15:40 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलढाणा जिल्ह्यात ६ पब्लिक हेल्थ युनिट आणि ३४ प्राथमिक आरोग्य उपकेंद्र बांधकामासाठी सुमारे २३ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरात मिळाली आहे. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी यासाठी केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे. या संदर्भातील आदेश बुलढाणा जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला पाठवण्यात आले आहेत..
बुलढाणा जिल्ह्यातील नागरिकांना चांगली आरोग्य सुविधा मिळावी या दृष्टिकोनातून जिल्ह्यात नव्याने सहा ब्लॉक पब्लिक हेल्थ युनिट आणि ३४ प्राथमिक आरोग्य उपकेंद्र अंतर्गत इमारतीचे बांधकाम होणार आहे. या संदर्भातील प्रस्ताव बुलढाणा जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने पाठवण्यात आला होता. याचा पाठपुरावा केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी केला. त्यानुसार १५ व्या वित्त आयोगातून बुलढाणा जिल्ह्यात सहा ब्लॉक पब्लिक हेल्थ युनिट बांधण्यासाठी प्रत्येकी ५० लक्ष याप्रमाणे तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तर जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रासाठी प्रत्येकी ५८.२७५ लाख याप्रमाणे एकूण २० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. खामगाव तालुक्यातील नांद्री, बोरजवळा, पारखेड, चिखली तालुक्यातील इसोली, गांगलगाव, सवना, करवंड, डोंगरशेवली, पळसखेड दौलत यासह इतर प्राथमिक आरोग्य उपकेंद्र अंतर्गत इमारत बांधकामासाठी निधी मंजूर झाला आहे..