चिखलीत मविआला विजयी करून लोकशाहीवादी प्रशासनाला बळ द्या; संदेश आंबेडकर यांचे चिखलीकरांना आवाहन...
भयमुक्त आणि भ्रष्टाचारमुक्त चिखली करणार : राहुलभाऊ बोंद्रे
जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल बोंद्रे म्हणाले की,चिखलीच्या सर्वांगीण आणि सर्वसमावेशक विकासासाठी मविआची सत्ता आवश्यक आहे. आम्ही भयमुक्त व भ्रष्टाचारमुक्त प्रशासनाचा संकल्प केला आहे. चिखली शहराला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आम्ही ठोस नियोजन केले, असल्याचे राहुल बोंद्रे म्हणाले.
चिखलीला विकासाच्या बाबतीत अग्रेसर करु : काशिनाथ आप्पा बोंद्रे
महाविकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काशिनाथ आप्पा बोंद्रे यांनी शहराच्या विकास आराखड्याविषयी विस्तृत भाष्य केले. पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते-विस्तारीकरण, स्ट्रीट लाइट, नागरिकांसाठी पारदर्शक सेवा आणि डिजिटल प्रशासन अशा विविध विषयांवर त्यांनी नागरिकांना आश्वस्त केले. चिखलीला विकासाच्या बाबतीत राज्यात अग्रेसर करण्याचा आमचा संकल्प आहे. नागरिकांच्या प्रत्येक गरजेसाठी पारदर्शक सेवा देणारे प्रशासन उभारणे हे माझे प्राधान्य असल्याचे ते म्हणाले.