वंचितांना साथ मिळतेय म्हणून प्रस्थापितांना पोटदुखी! डॉ.ऋतुजा चव्हाण यांचा हल्लाबोल! म्हणाल्या, ही लढाई शोषितांच्या हक्काची..! मेहकर- लोणार मतदार संघात प्रचाराला मिळतोय उस्फुर्त प्रतिसाद...
Nov 14, 2024, 13:58 IST
मेहकर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मेहकर- लोणारची जनता आता प्रस्थापितांना कंटाळली आहे. महायुती आणि महाविकास आघाडी दोन्ही आघाड्या प्रस्थापितांचे प्रतिनिधित्व करीत आहेत. दुसऱ्या बाजूला वंचित बहुजन आघाडी शोषित वंचितांच्या हक्कांसाठी आपला लढा बुलंद करीत आहे. त्यामुळे मेहकर विधानसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडी ला मिळणारी साथ ही प्रस्थापितांच्या पोटदुखीचे कारण ठरत आहे असा हल्लाबोल वंचित बहुजन आघाडीच्या मेहकर लोणार विधानसभा मतदारसंघाच्या अधिकृत उमेदवार डॉ.ऋतुजा चव्हाण यांनी केला आहे. मेहकर लोणार मतदार संघातील सावत्रा, कंबरखेड, भालेगाव या गावात झालेल्या प्रचार दौऱ्याला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी मतदारांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या..
पुढे बोलतांना त्या म्हणाल्या की, मेहकर-लोणार मतदार संघ हा ३० वर्षांत ५० वर्षे मागे गेलेला आहे. मतदारसंघ शेकडो समस्यांचे माहेर घर बनला आहे. या मतदारसंघात वंचित घटकांचे शोषण होत असल्याचा आरोपही डॉ.ऋतुजा चव्हाण यांनी यावेळी केला. मात्र आता प्रस्थापितांच्या घशातून सत्ता खेचून आणण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने हा लढा पुकारला आहे. या लढ्याला सामान्य जनतेचा गावोगावी उत्स्फूर्त प्रतिसाद निवांत असल्याने आपला विजय निश्चित असल्याचा विश्वासही डॉ.ऋतुजा चव्हाण यांनी व्यक्त केला. २० नोव्हेंबरला होणाऱ्या मतदानात गॅस सिलेंडर निशाणी समोरील बटन दाबून मतदान रुपी आशीर्वाद देण्याची विनंती डॉ.ऋतुजा चव्हाण यांनी केली आहे.