सुसंस्कृत राजकारणासाठी प्रेमलता सोनोने यांच्या पाठीशी उभे रहा! छत्रपती संभाजीराजे यांचे आवाहन; म्हणाले, प्रेमलता सोनोने हे सामाजिक जाण असलेले नेतृत्व....

 
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाण्यात सध्या विकृत राजकारण सुरू आहे, त्यामुळे बुलडाणा विधानसभा मतदारसंघात विकासाची सर्वांना सोबत घेऊन चालण्याचे सुसंस्कृत राजकारण व्हावे यासाठी स्वराज पक्षाच्या उमेदवार प्रेमलता सोनोने यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करावे असे आवाहन महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे संस्थापक छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी केले आहे.

 सध्या राजकीय संस्कृतीचा स्तर ज्या पद्धतीने खालवला आहे ते सुधारण्यासाठीच महाराष्ट्र स्वराज्य पक्षाची स्थापना केल्याचे छत्रपती संभाजीराजे म्हणाले. प्रेमलता सोनोने या सामाजिक जाण असलेले नेतृत्व आहेत. आतापर्यंत विविध समस्यांवर त्यांनी काम केले आहे. जिजाऊंच्या या भूमीत आम्हाला प्रेमलता सोनोने यांच्यासारख्या सक्षम उमेदवार मिळाला असेही छत्रपती संभाजीराजे भोसले म्हणाले. महाराष्ट्रात स्वराज्य पक्षाला भरभरून प्रतिसाद देण्यात आले, बुलढाणा विधानसभा मतदारसंघात देखील प्रेमलता सोनोने यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करावे असे आवाहन त्यांनी माध्यमांशी बोलताना केले.