उत्स्फूर्त जन सहभाग उदंड प्रतिसाद! आ. श्वेताताई महाले यांचा धाड सर्कलमध्ये भेटीगाठी दौरा; मतदारांशी साधला संवाद...

 
 चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):महायुतीतर्फे भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार म्हणून चिखली मतदारसंघात निवडणूक लढवणाऱ्या आ. श्वेताताई महाले यांनी दि. ४ नोव्हेंबर रोजी धाड जिल्हा परिषद सर्कलमधील 
ग्रामीण भागाचा भेटीगाठी दौरा केला. या दरम्यान त्यांनी म्हसला बु , बोदेगाव, ढंगारपूर, जांब, मौढाळा, कुलमखेड, म्हसला खु, करडी बोरखेड आणि धाड येथे भेटी देऊन स्थानिक मतदारांशी संवाद साधला या गाठीभेटी दौऱ्यात आ. महाले यांना स्थानिक भागातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दौऱ्यामध्ये भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यासह महायुतीमधील सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शक्ती केंद्रप्रमुख व बूथ प्रमुख सहभागी झाले होते.

  चिखली मतदारसंघाच्या आमदार म्हणून २०१९ ते २०२४ यादरम्यान कार्यकाळ गाजवणाऱ्या श्वेताताई महाले यांना महायुती शासन काळातील अडीच वर्षे सरकारकडून पाठबळ मिळाले. या अत्यल्प कालावधीत त्यांनी संपूर्ण मतदारसंघात संतुलित व समतोल विकास करण्याचा प्रयत्न केला.

धाड सर्कलमध्ये देखील लहान मोठ्या सर्वच गावांमध्ये शासनाच्या विविध योजनांमधून रस्ते, वीज, पाणी, सभामंडप, विद्युत रोहित्र, शेत रस्ते, गाव जोड रस्ते आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या. याशिवाय वैयक्तिक लाभाच्या योजनांचे फायदे देखील प्रत्येक पात्र लाभार्थीपर्यंत पोहोचवण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले. याचाच परिणाम आजच्या भेटीगाठी दौऱ्यात प्रत्येक गावामध्ये दिसून आला. 

गावोगावी महिलांकडून उस्फुर्त स्वागत
       आ. श्वेताताई महाले या आपल्या विकासकार्याने अल्पावधीतच लोकप्रिय ठरल्या; त्याची प्रचिती या गाठीभेटी दौऱ्यामध्ये प्रकर्षाने आली. आज भेटी दिलेल्या प्रत्येक गावामध्ये गावकरी व युवकांनी श्वेताताईंचे जल्लोषात स्वागत केले. विशेषतः महिला वर्गाने पुढाकार घेऊन आ. महाले यांचे मोठ्या आपुलकीने स्वागत केले. महायुती शासनाने आणलेल्या लाडकी बहीण योजनेचे लाभ प्रत्येक पात्र लाभार्थी माता भगिनी पर्यंत पोहोचवण्याचा यशस्वी प्रयत्न आ. महाले यांनी केला. याशिवाय कामगार कल्याण विभागाच्या संसार बाटलीचे वितरण देखील सर्व गरजूंना झाले.
इतरही शासकीय योजनांचे लाभ घरोघरी पोहोचवले. त्यामध्ये महिला लाभार्थ्यांची संख्या मोठी असल्याने प्रत्येक गावात स्थानिक माता भगिनींनी आ. श्वेताताई महाले यांचे हर्षोल्हासात स्वागत करून त्यांना आपल्या पाठिंबाचा शब्द दिला.