BREAKING घडामोडींना वेग! थोड्याच वेळात रविकांत तुपकर मातोश्रीवर; जयश्री शेळकेंना उमेदवारी मिळण्याची शक्यता? जिल्हा संपर्कप्रमुख नरेंद्र खेडेकर म्हणाले, सध्यातरी...

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा विधानसभा मतदारसंघाबाबत मुंबईत घडामोडींना वेग आलेला आहे. जिल्हा संपर्कप्रमुख नरेंद्र खेडेकर आणि जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत मुंबईतच आहेत. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना देखील मातोश्रीवरून बोलावणे आले आहे. थोड्याच वेळात रविकांत तुपकर मातोश्रीवर पोहोचणार आहेत, तिथे उद्धव ठाकरे यांच्याशी त्यांची चर्चा होईल. दरम्यान सद्यस्थितीत जयश्रीताई यांचे नाव उमेदवारीसाठी आघाडीवर असल्याचे सूत्रांनी सांगितले.. आज सायंकाळी त्यांचा शिवसेनेत प्रवेश देखील होऊ शकतो.त्यानंतरच त्यांच्या उमेदवारीवर अधिकृत शिक्कामोर्तब होईल..

दरम्यान यासंदर्भात बुलडाणा लाइव्ह ने जिल्हा संपर्कप्रमुख नरेंद्र खेडेकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, आम्ही सध्या मुंबईत आहोत. अध्याप तरी कोणाची उमेदवारी जाहीर झालेली नाही. सध्या तरी शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवंत यांचे नाव अग्रक्रमावर आहे. मात्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल.

 

 

कारण महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत येणे हे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. जालिंदर बुधवत यांच्या व्यतिरिक्त कुणाला उमेदवारी द्यायचीच असेल तर त्याआधी पक्षप्रवेश होईल आणि नंतरच उमेदवारी संदर्भातील निर्णय होईल असे नरेंद्र खेडेकर म्हणाले..