Amazon Ad

SPECIAL विरोध मावळला..! डॉ.राजेंद्र शिंगणेंनी बरोबर समन्वय साधला! सगळ बरोबर जुळवून आणलं;डॉ. शिंगणेंच्या विजयासाठी महाविकास आघाडीने कंबर कसली; शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवंत म्हणाले...

 
 देऊळगावराजा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): १९९५ पासून सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघावर डॉ.राजेंद्र शिंगणे यांचा एकछत्री अंमल...शिंगणे आणि विजयाचा गुलाल हे समीकरण ठरलेलंच.. विधानसभेच्या निवडणुकीत अपराजित राहिलेला हा योद्धा आता पुन्हा विजयी षटकार ठोकण्यासाठी सज्ज झाला आहे...२०१४ नंतर ५ वर्षे सक्रिय राजकारणातून ब्रेक घेतल्यानंतरही २०१९ च्या निवडणुकीत डॉ.शिंगणे यांनी दमदार पुनरागमन केले.. कोरोना काळात अन्न व औषध प्रशासन मंत्री म्हणून त्यांची कामगिरी उल्लेखनीय राहिली..राज्यात राजकीय समीकरणे बदलल्यानंतर डॉ.शिंगणे यांनी सर्वसामान्यांच्या जिल्हा बँकेचा विचार करीत अजित दादांसोबत जाण्याचा निर्णय घेतला.. जिल्हा बँकेला ३०० कोटी रुपयांचे सॉफ्ट लोन मिळवून दिले..मात्र आतापर्यंतच्या राजकीय कारकिर्दीत शरद पवारांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळख असलेले डॉ.शिंगणे अजित पवारांच्या राष्ट्रवादी फार काळ रमले नाही.."अपेक्षित जनहिताचा" हेतू सिद्ध झाल्यानंतर त्यांनी पुन्हा तुतारी फुंकली अन् शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्जही दाखल केला.. अगदी सुरुवातीला महाविकास आघाडीतून इच्छुक असलेल्या उमेदवाराकडून डॉ.शिंगणे यांना थोडाफार विरोध झालाही..मात्र डॉ.शिंगणे यांनी साधलेला योग्य तो समन्वय, सगळ्यांना विश्वासात घेण्याची पद्धत यामुळे तो विरोधही आता मावळला असून महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्या विजयासाठी कंबर कसली आहे...काल, २७ ऑक्टोबरला देऊळगाव राजात महाविकास आघाडीची समन्वय बैठक संपन्न झाली..या बैठकीत सर्वच पदाधिकाऱ्यांनी डॉ.शिंगणे यांच्या विजयाचा निर्धार केला..

  डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्यासह शिवसेनेचे जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवंत, सहसंपर्कप्रमुख छगन मेहेत्रे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षांचे प्रमुख पदाधिकारी या समन्वय बैठकीला उपस्थित होते. यावेळी बोलतांना डॉ.राजेंद्र शिंगणे महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले. तुमच्या आशीर्वाद आणि मेहनतीमुळेच आतापर्यंत इथपर्यंत पोहचलो. सिंदखेडराजा मतदारसंघात जी काही विकास कामे झाली आहेत त्यात तुमचाही महत्वाचा वाटा असे डॉ.राजेंद्र शिंगणे यावेळी म्हणाले.

 
प्रत्येक शिवसैनिक पूर्ण ताकदीने पाठीशी...
"डॉ. राजेंद्र शिंगणे यांची भूमिका नेहमीच जनहिताची राहिली आहे. त्यामुळे इथली जनता त्यांच्यावर भरभरून प्रेम करते. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आणि त्या सरकारमध्ये पुन्हा एकदा डॉ.राजेंद्र शिंगणे मंत्री हे चित्र आपल्याला २३ नोव्हेंबर नंतर पाहायला मिळेल असे प्रतिपादन यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवंत यांनी केले. मात्र गाफील न राहता प्रचाराचे योग्य नियोजन करून मित्र पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी आपापसात समन्वय ठेवावा आणि झपाटून कामाला लागावे असे आवाहन यावेळी त्यांनी केले. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा प्रत्येक शिवसैनिक डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या पाठीशी आपली ताकद उभी करेल असेही जालिंधर बुधवंत म्हणाले.बैठकीत महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आपापले मनोगत व्यक्त करीत संपूर्ण शक्तीनिशी डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्धार केला...