Special News : निवडणुकांचे पडघम! 11 पालिका, नगरपंचायतींच्या प्रभाग रचनेचा शुभारंभ; आता 2 जागांसाठी होणार रचना; शेवटचे वाॅर्ड राहणार त्रिसदस्यीय!!

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः राजकीय वर्तुळात नगर परिषद निवडणुकांचे मागील 2 महिन्यांपासून पडघम वाजायला लागले असून, आता त्यांचा आवाज टिपेला लागलाय! राजकीय हालचालींनी वेग घेतला असतानाच निवडणूक आयोगाने देखील प्राथमिक तयारीचा बिगूल वाजवला आहे. आयोगाच्या आदेशानुसार आता जिल्ह्यातील 9 नगरपरिषदा व 2 नगरपंचायतींच्या प्रभाग रचनेस प्रारंभ झाला असून, आता 2 सदस्यीय …
 
Special News : निवडणुकांचे पडघम! 11 पालिका, नगरपंचायतींच्या प्रभाग रचनेचा शुभारंभ; आता 2 जागांसाठी होणार रचना; शेवटचे वाॅर्ड राहणार त्रिसदस्यीय!!

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः राजकीय वर्तुळात नगर परिषद निवडणुकांचे मागील 2 महिन्यांपासून पडघम वाजायला लागले असून, आता त्यांचा आवाज टिपेला लागलाय! राजकीय हालचालींनी वेग घेतला असतानाच निवडणूक आयोगाने देखील प्राथमिक तयारीचा बिगूल वाजवला आहे. आयोगाच्या आदेशानुसार आता जिल्ह्यातील 9 नगरपरिषदा व 2 नगरपंचायतींच्या प्रभाग रचनेस प्रारंभ झाला असून, आता 2 सदस्यीय प्रभागाला अनुसरून रचना करण्यात येत आहे. बहुतेक ठिकाणी शेवटचा प्रभाग तीन सदस्यीय राहणार असल्याचे नगर प्रशासन विभागाच्या वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.

यापूर्वी आयोगाने एक सदस्यीय वाॅर्डनुसार प्रारूप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचे आदेश दिले होते. मात्र त्यानंतरच्या घडामोडींत मंत्रिमंडळ बैठकीत 2 सदस्यीय प्रभाग ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. अर्थात लोकसंख्या व मतदारसंख्या लक्षात घेता काही वाॅर्ड 3 सदस्यीय राहणार असे स्पष्ट करण्यात आले. बहुधा शेवटचे प्रभाग 3 सदस्यीय राहणार आहेत. जिल्ह्यातील 9 नगरपालिकांची मुदत लवकरच संपणार आहे. येत्या नोव्हेंबर वा डिसेंबरमध्ये निवडणुका अपेक्षित आहेत. यामध्ये बुलडाणा, चिखली, मेहकर, देऊळगाव राजा, खामगाव, नांदुरा, मलकापूर, जळगाव जामोद, शेगाव या पालिकांचा समावेश आहे. संग्रामपूर व मोताळा या नगरपंचायतींची मुदत गत डिसेंबरमधेच संपली असून त्यांचा प्रभागरचना, आरक्षण निश्चिती, अंतिम मान्यता आदी कार्यक्रम कधीचेच पार पडले आहेत. मात्र आता नव्याने या प्रक्रिया पार पाडाव्या लागणार आहेत.

ऑक्टोबरअखेर होणार प्रभाग रचना?
सन 2011च्या जनगणनेनुसार पालिका व नगरपंचायतींची सदस्यसंख्या निश्चित करण्यात येऊन प्रारूप प्रभाग रचना करण्यात येईल. मुख्याधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समिती ही गुंतागुंतीची कार्यवाही करणार आहे. ब वर्ग पालिकांच्या प्रभाग रचनेस जिल्हाधिकारी तर अंतिम मान्यता निवडणूक आयोग देईल. नगरपंचायतींमध्ये जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त ही जबाबदारी पार पाडणार आहेत.