Amazon Ad

SPECIAL! ३ लाख ५१ हजार ९१ मतदार ठरवणार मेहकरचा आमदार..! गुन्ह्यांची माहिती उमेदवारांना द्यावी लागणार वर्तमानपत्रात..

 
  
मेहकर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी निवडणुक कार्यक्रम घोषित करण्यात आलेला आहे. उमेदवारांनी त्यांच्यावर नोंदविलेल्या गुन्ह्याची माहिती दैनिक वृत्तपत्रामधून प्रसिध्द करावी. तसेच लोकशाहीच्या या मोठ्या उत्सवात सहभागी होऊन सर्व मतदारांनी आपले मतदानाचे कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन मेहकरचे उपविभागीय अधिकारी रवींद्र जोगी यांनी स्थानिक उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत केले.यावेळी तहसीलदार निलेश मडके नायब तहसीलदार अजय पिंपरकर प्रामुख्याने उपस्थित होते. 
यावेळी जोग यांनी निवडणूक कार्यक्रमाची सविस्तर माहिती दिली.
पुढे बोलतांना ते म्हणाले की, मेहकर विधानसभा मतदार संघामध्ये एकुण ३५० मतदान केंद्र आहेत. मतदान केंद्राची यादी https://ceoelection.maharashtra.gov.in
या वेबसाईटवर उपलब्ध आहे. मेहकर तालुका मतदान केंद्र संख्या २४३ लोणार तालुका मतदान केंद्र संख्या- १०७ एकुण ३५० मतदान केंद्र २०१ स्थळावर निश्चीत करण्यात आलेले आहेत. त्यापैकी शहरी क्षेत्रामध्ये २० मतदान केंद्र स्थळ आहेत तर ग्रामीण क्षेत्रामध्ये १८१ मतदान केंद्र स्थळ आहेत.
  मतदार संख्या पुरुष १५९०८६, महीला १४६१०१ तृतीय पंथी ४ असे एकूण ३०५१९१ मतदार आहेत. मेहकर तालुका मतदार संख्या २१०९०३ तर लोणार तालुका मतदार संख्या ९४२८८ आहे. दिव्यांग मतदार संख्या १८२४ असुन पुरुष १२०९ महीला ६१५ आहेत. ८५ वर्षे वयापेक्षा जास्त वय मतदार संख्या ३८६५ मतदारांना मतदार नोंदणी करण्याकरीता नामनिर्देशन पत्र भरण्याच्या शेवटच्या दिनांकाच्या दहा दिवस अगोदर पर्यंत नाव नोंदणी करीता अर्ज भरता येतील. १९ ऑक्टोबर रोजी पर्यंत मतदार नोंदणी केलेले मतदार विधानसभा मतदार संघाच्या मतदार यादी मध्ये समाविष्ट होतील. मेहकर मतदार संघामध्ये आदर्श आचार संहिता पालन करण्याकरीता चमू तयार करण्यात आलेल्या आहेत. 
  मतदारांना आदर्श आचार संहितेचे उल्लघंन करणाऱ्या विरुध्द तक्रार करण्यासाठी CVIGIL ॲप उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. त्यामधून स्वतःच्या मोबाईलवरून तक्रार नोंदविता येणार आहे. उमेदवारांना त्यांच्यावर नोंदविलेल्या गुन्हयाची माहिती दैनिक वृत्तपत्रामधून प्रसिध्द करावी लागणार आहे. तसेच मतदारांना उमेदवारांची माहिती केवायसी या ॲपवर मिळणार आहे.