सोनार समाज विकास महामंडळाची शासनाने केली स्थापना! मेहकरात आनंदोत्सव; समाजबांधवांनी ना.जाधव, आ. रायमुलकरांचा सत्कार केला...
Oct 4, 2024, 18:08 IST
मेहकर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): महाराष्ट्र शासनाने सोनार समाज विकास महामंडळाची स्थापना केल्याबद्दल मेहकर शहरातील सोनार समाज बांधवांनी पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. शासनाच्या या निर्णयाबद्दल आज केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव व आमदार संजय रायमुलकर यांचे आभार मानत त्यांचा सत्कार करण्यात आला.
सोनार समाजातील दुर्लक्षित घटकांच्या विकासासाठी सोनार समाजासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्यात यावे अशी महाराष्ट्रातील समाज बांधवांची खूप वर्षांची मागणी होती .आता महायुती सरकारने सोनार समाज विकास महामंडळाचे घोषणा केल्याने समाज बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. 👇
शासनाच्या या धाडसी निर्णयाबद्दल मेहकर शहरातील सुवर्णकार समाज बांधवांनी आज केंद्रीय आयुष, आरोग्य, कुटुंब कल्याण (स्वतंत्र प्रभार) राज्यमंत्री प्रतापराव जाधव, आमदार संजय रायमुलकर यांचा राम मंदिर येथे सत्कार केला .समाज बांधवांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,अजित दादा पवार यांच्यासह राज्य शासनाचे आभार मानले आहेत. सुवर्णकार समाज बांधवांनी आज गुलाल उधळत पेढे वाटून आपला आनंद साजरा केला.👇
यावेळी अखिल भारतीय सोनार समाज फेडरेशनचे अध्यक्ष मोहन हिवरकर, संत नरहरी समाज मंडळाचे सुनील निंबेकर, सुधीर सारोळकर ,आनंद काटकर ,अमोल काटकर सुरेश खंदारकर ,शेखर काटकर ,संदीप सावरकर, विठ्ठल खंदारकर ,नंदकिशोर नंदनकर ,गजानन नागपूरकर ,गणेश दुरतकर ,रमेश काटकर, प्रशांत महामुने, कैलास अर्धापूरकर, दत्ता नवले, शिवसेनेचे तालुकाप्रमुख सुरेशतात्या वाळूकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.