Amazon Ad

कुणी खोक्यासाठी गेले कुणी स्वार्थासाठी गेले डॉ. राजेंद्र शिंगणे सर्वसामान्यांच्या जिल्हा बँकेसाठी गेले! खा.अमोल कोल्हे यांचे प्रतिपादन;

 विराट जनसमुदायाच्या साक्षीने डॉ. शिगणेंनी भरला उमेदवारी अर्ज!डॉ.शिंगणे म्हणाले, आयुष्याचा क्षण अन् क्षण सिंदखेडराजा मतदार संघासाठी..
 
 सिंदखेडराजा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): ढोल ताशांचा गजर.. फटाक्यांची आतिषबाजी..डॉ.शिंगणे साहेब तुम आगे बढो च्या गगनभेदी घोषणा..जिकडे तिकडे महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या चिन्हांचे फडफडणारे झेंडे अन् सर्वांच्या चेहऱ्यावर विजयाचा "दुर्दम्य आत्मविश्वास"...हे चित्र होते महाराष्ट्राला शिवछत्रपतींसारखा छावा देणाऱ्या राष्ट्रमाता जिजाऊंचे जन्मस्थान असलेल्या मातृतीर्थ सिंदखेड राजात...निमित्त होते महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ.राजेंद्र शिंगणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे...आज,२५ ऑक्टोबरला हा सोहळा पार पडला..या सोहळ्यानंतर कार्यकर्ते गावाकडे परतले ते २३ नोव्हेंबरला डॉ.राजेंद्र शिंगणे यांचा सहाव्यांदा गुलाल उधळण्याचा संकल्प घेऊनच..यावेळी झालेल्या सभेतील खा. अमोल कोल्हे यांचे भाषण या सोहळ्याला एका वेगळ्या उंचीवर घेऊन गेले.."कुणी खोक्यासाठी गेले, कुणी स्वार्थासाठी गेले मात्र आपले डॉ.राजेंद्र शिंगणे साहेब सर्व सामान्य शेतकऱ्यांची जिल्हा बँक वाचवण्यासाठी गेले." असे प्रतिपादन खा.अमोल कोल्हे यांनी करताच टाळ्यांचा एकच गजर झाला...

 पुढे , बोलतांना खा.अमोल कोल्हे म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे राज्य निर्माण केलं. या स्वराज्याचं बलस्थान नैतिक अधिष्ठान होतं. अशा महाराष्ट्रात कोठे घेऊन आमदार विकले जातात ही दुर्दैवाची गोष्ट आहे. कोणतीही नैतिकता गेल्या दोन अडीच वर्षांत महायुती सरकारने पाळली नाही...त्यामुळे महाराष्ट्र धर्माची ओळख असलेली नैतिकता जपण्यासाठी पुन्हा एकदा महाविकास आघाडीचे सरकार आवश्यक असल्याचे ते म्हणाले. डॉ.राजेंद्र शिंगणे जे काही करतात ते सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी करतात म्हणूनच त्यांचा विजयाचा मार्ग कुणीही रोखू शकत नाही असेही खा.अमोल कोल्हे म्हणाले.
  सिंदखेडराजा मतदारसंघ माझे कुटुंब...
  
यावेळी बोलतांना डॉ.राजेंद्र शिंगणे म्हणाले की, गेल्या सव्वा वर्षांत मला निवांत झोप लागली नाही. जेव्हा शरद पवार साहेबांकडे परत आलो तेव्हा मला निवांत झोप लागली. सिंदखेड राजा मतदारसंघ हे मी माझे कुटुंब समजतो..५ वेळा या मतदारसंघाने माझ्यावर विश्वास मला दाखवून सभागृहात पाठवले. त्यामुळे यापुढेही आयुष्याचा क्षण आणि क्षण सिंदखेडराजा मतदार संघ या माझ्या कुटुंबासाठीच असणार आहे असे ते म्हणाले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष रेखाताई खेडेकर, काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे, शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख नरेंद्र खेडेकर, जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवंत, श्याम उमाळकर, सिद्धार्थ खरात, रजनीताई शिंगणे, छगन मेहत्रे, रामप्रसाद शेळके, सतीश काळे, सिताराम चौधरी यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या सभेचे बहारदार सूत्रसंचालन महाराष्ट्रातील नामवंत कवी अजीम नवाज राही यांनी केले...