...म्हणून श्वेताताईंच्या विजयाचा मार्ग झालाय सुकर! लोकांनीच दिली विकासकन्येची बिरुदावली...

 
 चिखली:(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा ):चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ.श्वेताताई महाले पाटील आपल्या लढवय्या स्वभावाने राज्याला परिचित झाल्या आहेत. आमदार म्हणून पहिली अडीच- तीन वर्षे विरोधी पक्षात आणि नंतरची २ वर्षे सत्ताधारी पक्षात असा आमदार श्वेताताईंचा कार्यकाल राहिला. विरोधी पक्षात असताना ताईंचा आक्रमक स्वभाव राज्याने पाहिला. त्यावेळी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी वीज वितरण कंपनीच्या विरोधातील आंदोलन असो वा कोविड काळात मका खरेदीसाठी केलेले आंदोलन असो..प्रश्नांचा फडशा कसा पाडायचा असतो हे आमदार श्वेताताईनी दाखवून दिले. महायुतीची सत्ता आल्या नंतर विकासकन्या ही बिरूदावली श्वेताताईंना लोकांनीच दिली. दोन वर्षांत हजारो कोटी रुपयांचा निधी ताईंनी मतदारसंघात आणला. त्यापैकी अनेक कामे पूर्ण झाली असून बहुतांश कामे प्रगतीपथावर आहेत..त्यामुळे यंदाची निवडणूक श्वेताताईंना जड जाईल, कठीण जाईल असा जो नेरेटीव्ह विरोधकांकडून सेट करण्याचा प्रयत्न होत आहे त्याला यश मिळणार नाही.एकंदरीत विकासाभिमुख नेतृत्वामुळे ताईंच्या विजयाचा मार्ग सुकर झाल्याचेच चित्र आहे...

 श्वेताताईंनी शेती प्रश्नांवर केलेल्या कामामुळे ताईंना शेतकऱ्यांच्या हृदयात स्थान मिळाला आहे. याशिवाय आरोग्य, सिंचन, पांधण रस्ते, अल्पसंख्यांक विकास, चिखली शहराची पाणीपुरवठा योजना, जलजीवन मिशनची कामे, गाव जोड रस्ते ही श्वेताताईंची मोठी उपलब्धी म्हणावी लागेल. खरेतर चार -चार पाच-पाच टर्म लोकप्रतिनिधी राहून देखील अनेकांना श्वेताताई एवढी कामे करता आली नाहीत. मात्र अवघ्या २ वर्षाच्या सत्ताकाळाचे सोने ताईंनी करून दाखवले.

विरोधकांकडे मुद्दे नाहीत..
 या निवडणुकीत ताई विकास कामांना घेऊन निवडणुकीला सामोरे जात आहे. सांगण्यासारखी शेकडो कामे असल्यामुळे केवळ विकास आणि विकास हाच या निवडणुकीचा केंद्रबिंदू श्वेताताईंनी केला आहे. मात्र दुसऱ्या बाजूला विरोधकांकडे कोणतीही प्रभावी मुद्दे नाहीत. विरोधक बोंद्रे वारंवार महाले कुटुंबियांवर व्यक्तिगत टीकाटिप्पणी करीत आहेत, मात्र श्वेताताई केवळ विकास हाच मुद्दा घेऊन मतदारांपर्यंत जात आहे.त्यामुळे राहुल बोंद्रेंचे असे वागणे जनतेला काही पटलेले दिसत नाही, त्यामुळेच की काय श्वेताताईंच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून गावोगावचे काँग्रेस कार्यकर्ते भाजपात प्रवेश करत आहेत..एकंदरीत आता श्वेताताईंचा प्रवास विजयाकडे तर राहुल बोंद्रेंचा प्रवास पराभवाकडे होतांना दिसत आहे..