बहिण लाडकी, भाऊ लाडका! शेतकरी मात्र परका..! शेतकऱ्यांची ताकद आक्रोश मोर्चात दिसणारच! मशाल यात्रेत उपजिल्हाप्रमुख सुनील घाटे यांचे प्रतिपादन.

 
बुलडाणा
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): काळया मातीत इमाने इतबारे राबराब कष्ट उपसणाऱ्या शेतकऱ्यांना केवळ बळीराजा म्हणणार सरकार मात्र आम्हाला मदत करताना वेळकाढू धोरण अवलंबत आहे. लाडका भाऊ , लाडक्या बहिणी सारख्या योजना देताना शेतकरी मात्र यांना परका आहे. सोयाबीन आणि कापसाच्या भावाच आज काय सुरू आहे, हे आम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही. त्यामुळे जालिंदर बुधवतांच्या नेतृत्वात निघणारा आक्रोश मोर्चा शेतकऱ्यांची ताकद खऱ्या अर्थाने दाखवून देईल असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपजिल्हाप्रमुख सुनील घाटे म्हणाले. 
                          
  मोताळा तालुक्यात आक्रोश मोर्चाच्या निमित्ताने सुरू असलेल्या मशाल यात्रेला गावोगावी मिळणारा प्रतिसाद मोठा आहे. या मशाल यात्रेत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा घडवून येत आहेत. शेतकऱ्यांचे, बेरोजगारांचं म्हणणं शासनाला स्पष्टपणे कळालं पाहिजे, यासाठी आपली ताकद दिसली पाहिजे म्हणून ही मशाल यात्रा शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांच्या नेतृत्वात सुरू आहे. यावेळी झालेल्या सभेत सुनील घाटे यांनी शेतकऱ्यांची व्यथा सर्वांसमोर मांडली. 
यावेळी उपजिल्हा प्रमुख सुनील घाटे, अपंग सेलचे जिल्हा प्रमुख रामदास सपकाळ, तालुका प्रमुख लखन गाडेकर, माजी तालुका प्रमुख वासुदेव बंडे पाटील, तालुका संघटक राजु बोरसे, युवासेना उप जिल्हा प्रमुख शुभम घोंगटे, डॉ अरुण पोफळे, कि से त प्र अशोक गव्हाणे, सुधाकर सुरडकर, बाजार समिती संचालक संजय दर्डा, राजु मुळे, युवासेना ता प्र संजय शिंदे, उप ता प्र विजय इतवारे, ओमप्रकाश नाटेकर, अनंता शिप्पलकर, कामगार सेना ता प्र गजानन कुकडे, सागर घोंगटे, सा न्या वि ता प्र भागवत शिकारे, ओ बो सी सेल ता प्र संदीप पाटील, मंगेश बंडे पाटील, गुलाबराव व्यवहारे, मोहम्मद सोफियान, राहुल जाधव, समाधान बुधवत, रवी गोरे, सुधाकर आघाव, दिपक पिंपळे श्रावण बोरकर, अनिल राणा, निलेश पाटील, विशाल पाटील, सुभाष तामगर, किरण हुंबड, सुनील पाटील, भास्कर शिंदे, गजानन देवाजी पालवे, कमलाकर पालवे, गोपाल जवरे, रामेश्वर बुधवत, बाळासाहेब सिनकर, यांच्यासह शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते तसेच शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.