एकच मिशन - जुनी पेन्शन! राहुल बोंद्रेंचा नारा! म्हातारपणाच्या काठीसाठी प्रयत्न करणार असल्याचा दिला शब्द..

 
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): पेन्शन हा कर्मचाऱ्यांच्या बाबतीतला महत्वाचा मुद्दा आहे. सरकारी कर्मचारी जुन्या पेन्शन साठी लढा देत आहेत. पेन्शन म्हणजे म्हातारपणाची काठी आहे. ही काठी पुन्हा मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे असा शब्द चिखली विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राहुल बोंद्रे यांनी दिला आहे. 

 सरकारी कर्मचारी आपल्या आयुष्यातील महत्त्वाची वर्षे सरकारची सेवा करण्यासाठी घालवतात. त्यामुळे सेवानिवृत्तीनंतर त्या कर्मचाऱ्यांची काळजी घेण्याची जबाबदारी ही सरकारची असते. मात्र महायुती सरकार ही जबाबदारी झटकत असल्याचा आरोप राहुल बोंद्रे यांनी केला आहे. हिमाचल प्रदेश मध्ये काँग्रेसचे सरकार आल्यानंतर तिथे जुनी पेन्शन योजना लागू करण्यात आली. राहुल गांधी यांनी सुद्धा जिथे जिथे काँग्रेसचे सरकार येईल तिचे तिथे जुनी पेन्शन लागू करण्यात येईल असा शब्द दिला आहे. त्यामुळे २० नोव्हेंबरला आपल्याला मत रुपी आशीर्वाद द्यावे..मी जुन्या पेन्शनच्या मुद्द्यासाठी लढाई लढेल असे राहुल बोंद्रे यांनी प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओत म्हटले आहे.