

कर्जमुक्तीचे आंदोलन पेटण्याची चिन्हे! तुपकरांच्या शिलेदारांच्या अटकेचा जिल्ह्यात तीव्र संताप; संतप्त शेतकऱ्यांनी सिंदखेडराजा तहसील कार्यालयाच्या आवारात टाकला सोयाबीनचा सडा
Mar 18, 2025, 15:44 IST
सिंदखेडराजा (ऋषी भोपळे:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी अरबी समुद्रात सातबारे बुडवण्याच्या आंदोलनाची घोषणा केली आहे. आज रविकांत तुपकर शेतकऱ्यांची फौज घेऊन मुंबईच्या दिशेने निघणार होते मात्र त्याआधीच रविकांत तुपकर यांच्या महत्त्वाच्या शिलेदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. असे असले तरी रविकांत तुपकर मात्र भूमिगत घेऊन मुंबईत पोहोचल्याची चर्चा आहे. दरम्यान रविकांत तुपकर यांच्या प्रमुख शिलेदारांना अटक केल्याच्या निषेधार्थ जिल्हाभरातील शेतकरी वर्गातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. सिंदखेडराजा येथील तहसील कार्यालयासमोर संतप्त शेतकऱ्यांनी सोयाबीनचा सडा टाकला आहे..
सिंदखेड राजा तहसील कार्यालयात विनायक पाटील यांच्यासह शेतकऱ्यांनी सोयाबीनचा सडा टाकत आंदोलन केले. रविकांत तुपकर यांच्या शिलेदारांना अटक केल्याच्या कारवाईच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले.