उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आ. श्वेताताईंची पहिली प्रतिक्रिया! पक्षश्रेष्ठींचे मानले आभार! म्हणाल्या,विकासाच्या...

 
 चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): विधानसभा निवडणुकीच्या तयारीत भाजपने आघाडी घेतली आहे. भाजपने आज,२० ऑक्टोबरला सर्वात आधी आपल्या ९९ उमेदवारांची यादी जाहीर केली. बुलडाणा जिल्ह्यात भाजपने पुन्हा एकदा चिखलीतून विद्यमान आमदार श्वेताताई महाले पाटील, खामगाव मधून आकाश फुंडकर, जळगाव जामोद मधून डॉ.संजय कुटे यांना रिंगणात उतरवले आहे. दरम्यान चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले पाटील यांनी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. आमदार श्वेताताई यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, जेपी नड्डा, देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह पक्षातील वरिष्ठ नेतृत्वाचे आभार प्रदर्शन मानले आहेत. पक्षनेतृत्वाने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे त्या म्हणाल्या...
 
   चिखली विधानसभा मतदारसंघात गेल्या दोन - अडीच वर्षांत हजारो कोटींची विकासकामे केली. मतदार संघातील एकही गाव असे नाही जिथे विकासकामे झाले नाहीत. मतदारसंघातील जनतेचा आशीर्वाद असल्यामुळेच पक्ष नेतृत्वाने पुन्हा एकदा उमेदवारी दिली. पक्ष नेतृत्वाने दाखवलेला हा विश्वास मी सार्थ ठरवेल. विकासाच्या मुद्द्यांना घेऊनच आम्ही मतदार संघातील जनतेपर्यंत जाणार आहोत असेही आमदार श्वेताताई म्हणाल्या...