रायपूर सर्कलमध्ये घोंगावले श्वेताताईंच्या प्रचाराचे वादळ! व्यापक जनप्रतिसादातून श्वेताताईंना मताधिक्य मिळण्याची खात्री....
Nov 9, 2024, 08:08 IST
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): आपल्या विकासकार्यातून चिखली मतदारसंघाचे रुपडे पालटण्याचा संकल्प केलेल्या व या संकल्पपूर्तीसाठी अहोरात्र प्रयत्नशील असलेल्या भाजपा महायुतीच्या चिखली विधानसभा मतदारसंघातील उमेदवार आ. श्वेताताई महाले यांच्या भेटीगाठी दौऱ्याला ग्रामीण भागात उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. प्रत्येक जिल्हा परिषद सर्कलमध्ये श्वेताताईंचे गावकऱ्यांकडून स्वागत होत आहे. असेच चित्र ७ नोव्हेंबर रोजी झालेल्या रायपूर जिल्हा परिषद सर्कलमधील दौऱ्यात देखील पाहायला मिळाले. पांगरी, साखळी खुर्द, केसापूर, माळवंडी, दुधा, चिखला घाटनांद्रा ढासाळवाडी पळसखेड आणि रायपूर येथे मिळालेल्या व्यापक जनप्रतिसादातून या सर्कलमध्ये श्वेताताईंना मोठे मताधिक्य मिळणार असल्याची मनोमन खात्री पटली.
आपल्या पहिल्याच टर्ममध्ये पाच वर्षांपैकी पहिली आली अडीच वर्षे मविआच्या सरकारमुळे विकास निधी प्राप्त न झाल्याची उणीव श्वेताताईंनी महायुतीचे सरकार आल्यानंतर कितीतरी अधिक पटीने भरून काढली. मागील अडीच वर्षात हजारो कोटी रुपयांचा विकास निधी त्यांनी आपल्या मतदारसंघात खेचून आणत शहर व ग्रामीण भागात " न भूतो न भविष्यती * अशा प्रकारची विकास कामे मार्गी लावली रायपूर सर्कलमध्ये देखील श्वेताताईंनी पायाभूत सुविधा निर्माण करण्याचा अक्षरशः धडाका लावला. प्रत्येक गावामध्ये रस्ते, वीज आणि पाणी या मूलभूत सोयी स्थानिक गावकऱ्यांना मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न आणि पाठपुरावा आ. महाले यांनी केल्यामुळेच आज या परिसराचे चित्र पालटत असल्याचे दिसून येते.
विकासकार्याला मिळतोय मतदारांचा प्रतिसाद
श्वेताताई महाले यांच्यापूर्वी दहा वर्षे आमदार असलेल्या काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षंकडून रायपूर सर्कलवर सातत्याने अन्याय होत गेला. केवळ खोटी आश्वासने देत मते लाटण्याचे काम त्यांनी केले. त्यामुळे या परिसराचा विकास खुंटला होता. आता मात्र श्वेताताई महाले यांनी " बोले तैसा चाले " या तत्त्वानुसार कामगिरी करत आपल्या पदाला न्याय देण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला. त्यांच्या या प्रयत्नाची फलनिष्पत्ती म्हणून रायपूर सर्कलमधील प्रत्येक गावामध्ये आ. श्वेताताई महाले यांनी केलेल्या विकासकार्याचा उत्तम प्रतिसाद त्यांना मिळत आहे.
महायुतीच्या कार्यकर्त्यांची एकजूट
आपल्यापर्यंत आलेली प्रत्येक समस्या सोडवण्याचे व्रत घेतलेल्या व विकासामध्ये कधीही पक्षीय राजकारण किंवा जात - धर्म आदी भेदभाव न करणाऱ्या आ. महाले यांनी पारदर्शीपणे व सर्वांना न्याय देत सर्वांगीण विकास करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मागील अडीच वर्षात केला. त्यामुळे श्वेताताईंच्या विजयामध्ये आपला देखील हातभार लागावा यासाठी महायुतीमधील भाजपासह शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, पीपल्स रिपब्लिकन पार्टी, आरपीआय, रयत क्रांती संघटना या सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी, नेते व कार्यकर्ते सुद्धा जोमाने प्रचार कार्यात कार्यास लागले आहेत. प्रत्येक बुथवर श्वेताताईंना कसे मताधिक्य मिळेल याचा आटोकाट प्रयत्न महायुतीमधील सर्वच घटक पक्षांकडून होताना दिसत आहे.