श्वेताताई महाले ५० हजारांच्या मताधिक्याने पुन्हा आमदार होणार! सतीश गुप्तांचा विश्वास! चिखली शहरात प्रचाराचा झंझावात...

 
 चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):जनतेच्या आशीर्वादाने मिळालेल्या पदाचा उपयोग आपल्या परिसराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी करणाऱ्या कर्तव्यदक्ष लोकप्रतिनिधी म्हणून आ. श्वेताताई महाले यांनी त्यांच्या प्रचंड विकासाकामांमधून प्रगतीचा एक नवा अध्याय लिहायला घेतला आहे. या प्रगतीचा लाभ सर्वसामान्य माणसांच्या जीवनात परिवर्तन करणारा असून त्यामुळेच चिखली मतदारसंघातील जनतेचे भरभरून आशीर्वाद श्वेताताईंना मिळणार असून याच आशीर्वादाच्या बळावर आ. श्वेताताई महाले या निवडणुकीत तब्बल ५० हजाराच्या मताधिक्याने विजयी होऊन पुन्हा विधानसभेत पोहचतील असा विश्वास चिखली अर्बन बॅंकेचे अध्यक्ष सतीश गुप्त यांनी केले. दि. ५ नोव्हेंबर रोजी शहरातील प्रभाग क्र. १२ मधील संभाजीनगर परिसरात आयोजित करण्यात आलेल्या प्रचार सभेत बोलताना केले.
  महायुतीकडून उमेदवार असलेल्या आ. श्वेताताई महाले यांच्या प्रचारार्थ शहरातील प्रत्येक प्रभागात कॉर्नर बैठकांचे आयोजन केले जात आहे. या अंतर्गत दि. ६ नोव्हेंबर रोजी संभाजीनगर सहारा कॉलनी व गजानन नगरमध्ये कॉर्नर बैठक यांचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकांमध्ये भाजपाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य सुरेशअप्पा कबुतरे, शहराध्यक्ष पंडितराव देशमुख, ज्येष्ठ नेते एड. मंगेश व्यवहारे, रामदासभाऊ देव्हडे, 
सुदर्शन भालेराव, पिरेपाचे जिल्हाध्यक्ष भाई विजय गवई, यांच्यासह भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, परिपा आदी महायुतीमधील नेते पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.  
       
शाश्वत विकासासाठी मतदान करा - आ. श्वेताताई महाले
 चिखली मतदारसंघाची आमदार म्हणून काम भ्रष्टाचार मुक्त पारदर्शी अशा शाश्वत विकासाला मी नेहमीच प्राधान्य दिले. यामधून शहर व ग्रामीण भागातील जनतेचे जीवनमान उंचावण्याचा माझा प्रयत्न राहिला. या प्रयत्नाची पोच पावती म्हणून पुन्हा एकदा विधानसभेत आपल्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मला मतदारांनी द्यावी असे आवाहन या सभेत बोलताना आ. श्वेताताई महाले यांनी केले. 
श्वेताताईंनी चिखली शहरात विकासाचे नवे पर्व सुरू केले - पंडितराव देशमुख
मोठी बाजारपेठ व शैक्षणिक केंद्र असलेल्या चिखली शहराची ओळख जिल्ह्याची राजकीय राजधानी म्हणून देखील आहे. असे विविध दृष्टीने महत्त्वाचे शहर असलेल्या चिखली शहरात मात्र आजवर मुलभूत सुविधा उपलब्ध नव्हत्या. शहरातील प्रत्येक प्रभागातील ही उणीव दूर करून शहरात सौंदर्यीकरणाची भर घातली. गेल्या ३५ वर्षापासून ज्या समस्येने चिखलीकर त्रस्त होते ती पाणी समस्या दूर करण्यासाठी १३२ कोटी रुपये निधी शासनाकडून खेचून आणत सुधारित पाणीपुरवठा योजना मंजूर करून घेतली. या सर्व विकासकामांमधून आ. श्वेताताई महाले यांनी प्रगतीचे एक नवे पर्व सुरू केले. हे पर्व असेच पुढे सुरू राहावे यासाठी श्वेताताई महाले यांनाच पुन्हा एकवार संधी द्यावी अशी अपेक्षा भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष पंडितराव देशमुख यांनी व्यक्त केली. 
भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य सुरेशअप्पा कबुतरे, पिरिपाचे जिल्हाध्यक्ष भाई विजय गवई, ज्येष्ठ नेते रामदासभाऊ देव्हडे यांनी देखील या सभेमध्ये आपले विचार व्यक्त केले. युवराज भुसारी सरचिटणीस भाजप, महेश लोणकर, गोविद देव्हडे,विजय नकवाल,सागर पुरोहित शहर अध्यक्ष युवा मोर्चा,नारायण भुजबळ, शैलेश देशमुख, शाम वाकदकर संभाजीनगर, सहारा कॉलनी, गजानन नगर या परिसरातील मतदार बंधू भगिनी युवक तसेच भाजपा शिवसेना, पीरिपा महायुतीचे कार्यकर्ते याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते.