धाड सर्कलमध्ये श्वेताताईंना मिळतोय वाढता पाठिंबा; महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केला भाजपात प्रवेश..
आ. श्वेताताई महाले यांनी गेल्या केवळ अडीच वर्षात हजारो कोटी रुपयांचा निधी चिखली मतदारसंघात खेचून आणला. या निधीमधून धाड सर्कलमध्ये कधी नव्हे एवढी विकासकामे श्वेताताईंनी केली. अंतर्गत रस्ते, जोड रस्ते, पांधण रस्ते, जलजीवन मिशन, सभामंडप, विद्युत रोहित्र या माध्यमातून ग्रामीण भागातील रहिवाशांच्या रस्ते, वीज आणि पाणी या मूलभूत समस्या सोडवून दाखवल्या; त्यामुळे धाड सर्कलमध्ये आ. महाले यांची लोकप्रियता वाढली असून ग्रामीण भागातील महाविकास आघाडीमधील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना उबाठा पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत आहेत. २८ ऑक्टोबर रोजी आ. श्वेताताई महाले यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
या निमित्ताने झालेल्या जाहीर सभेत धाड सर्कलमधील बबलू वाघुर्डे, अनिल कुटे, टीका खान, गणेश वाघुर्डे, अनिस जमदार, ईश्वर कोप्पे, अरविंद वाघुर्डे, सोहिल सौदागर, गजानन टेकाळे, वैभव वाघुर्डे, सतीश जंजाळ, फैसल खान, मतीन जमदार, गोपाल वाघुर्डे, शे.शाहरुख शे. छोटू, शे. सोफियान शे. छोटू, गणेश चोपडे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. गणेश मांटे, जिल्हा सचिव एड. सुनील देशमुख, वृषभ पाटील यांनी या सर्व कार्यकर्त्यांचे भारतीय जनता पक्षा स्वागत केले.