EXCLUCIVE म्हणून तर डॉ.संजय कुटेंचे मंत्रिपद गेले नसावे? श्वेताताईंच्या विरोधात उभे राहणारे शरद चेके म्हणतात मी डॉ.संजय कुटेंचा कार्यकर्ता....आणखीही बरीच कारणे, वाचा...
पुराव्यादाखल इथे या मुद्द्यांची चर्चा करावयाची झाल्यास चिखली विधानसभा मतदारसंघात आ. श्वेताताई महाले यांच्या विरोधात शरद चेके हे अपक्ष रिंगणात होते. मनोज जरांगे यांचे आपल्याला समर्थन असल्याचे ते सांगत होते. बुलडाण्यातील भाजप नेते योगेंद्र गोडे यांच्याशी संबधित संस्थेत प्राध्यापक असलेल्या चेके यांना केवळ ५३२ मते मिळाली. आ. श्वेताताई महाले यांना मिळणारी मराठा समाजाची मते कमी करण्यासाठीच चेके यांना उभे केले असावे अशी शंका त्यावेळीही अनेकांच्या मनात होती. अर्थात त्यात फारसे यश आले नाही हा भाग वेगळा. मात्र चेके यांचे योगेंद्र गोडे मार्गे डॉ.संजय कुटे कनेक्शन काही लपून राहिले नाही. आता स्वतः शरद चेके सोशल माध्यमांवर डॉ.संजय कुटे यांच्या समर्थनार्थ अनेक पोस्ट टाकताना दिसलेत. मी स्वतः डॉ.संजय कुटे यांचा कार्यकर्ता आहे असे शरद चेके जाहीररीत्या सांगताना दिसतात. त्यामुळे अप्रत्यक्षरित्या डॉ.कुटे श्वेताताईंच्या विरोधात होते का? हा सवाल भाजप कार्यकर्त्यांच्या मनात निर्माण होणे स्वाभाविक आहे. दुसरीकडे बुलडाणा विधानसभा मतदारसंघात तर आ.संजय गायकवाड यांनी उघडपणे डॉ.संजय कुटे यांनी विरोधात काम केल्याचा आरोप केला आहे. डॉ.संजय कुटेंचे विश्वासू असलेल्या योगेंद्र गोडेंना एका प्रचार बैठकीला बोलावण्यासाठी किती आटापिटा करावा लागला हे देखील आ.गायकवाड यांनी सांगितले.खामगाव आणि मलकापुरात देखील डॉ.संजय कुटे यांनी विरोधात काम केल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे.
मेहकर मध्ये भाजपची संघटनात्मक दोन शकले झाली आहेत. दोन तालुकाध्यक्ष, दोन शहराध्यक्ष अशा जबाबदाऱ्या आहेत. त्यातील एक "अनधिकृत" गट डॉ.संजय कुटेंचे समर्थन करणारा आहे. "पक्षशिस्त" आडवी येत असल्याने आणि काही मर्यादा असल्याने आ.गायकवाड यांच्यासारखे उघडपणे भाजपचे इतर पदाधिकारी या विषयावर बोलू शकणार नाहीत. इतरही अनेक कारणे आहेत मात्र ती "खाजगी" कारणे असल्याने त्या विषयावर इथे लिहिणे उचित होणार नाही..मात्र ती कारणे देखील डॉ.संजय कुटे यांचा मंत्री पदाचा पत्ता कट होण्यासाठी कारणीभूत ठरली असावीत"च"! आता राहिला विषय वर उल्लेख केलेल्या "जादा खुशी अन् थोडा गम" या बद्दलचा..तर तो असा आहे की भाजपची संस्कृती ती व्यक्तिनिष्ठ नाही, त्यामुळे जिल्ह्याच्या वाट्याला आकाश फुंडकर यांच्या रूपाने मंत्रीपद मिळाले याबद्दल सर्वच स्तरातून भाजप कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. तर थोड्या प्रमाणात असलेले "व्यक्तिनिष्ठ" डॉ. कुटे समर्थक नाराज झालेत..म्हणूनच "जादा खुशी अन् थोडा गम.." बरोबर हाय का नाय..?