धक्कादायक! विहीर खोदतांना क्रेनचे टप पडले डोक्यात; मजुराचा मृत्यू; दोघे थोडक्यात वाचले; संग्रामपूर तालुका हादरला....
Dec 25, 2024, 11:45 IST
संग्रामपूर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): तालुक्यातील पळशी झाशी शिवारातील एका शेतकऱ्याच्या शेतात विहिरीचे खोदकाम करून क्रेनच्या सहाय्याने खोदलेली माती - बाहेर काढतांना क्रेनचा वायरोप तुटून मातीने भरलेले लोखंडी टप मजुराच्या डोक्यावर पडल्याने मजूर जागीच मृत्यू झाल्याची घटना २४ डिसेंबर रोजी सकाळी ९:३० वाजता दरम्यान घडली. मृतक मजुराचे नाव विनोद मनोहर सावदेकर (वय ३९) रा. पळशी झाशी, असे आहे ...
संग्रामपूर तालुक्यातील पळशी झाशी शिवारात मृतकाच्या मामा यांच्या शेतात विहिरीचे खोदकाम सुरू होते. सदर शेतातील विहिरीमध्ये इतर सहकारी मजुरांसोबत मजुरीने काम करण्यासाठी मृतक विनोद सावदेकर हे गेले होते. विहिरीतील खोदलेली माती लोखंडी टपमध्ये बाहेर टाकण्यासाठी क्रेन विहिरीतून लोखंडी टपवर जात असतांना क्रेनचा अचानक वायरोप तुटला. यावेळी मातीने भरलेला लोखंडी टप मजूर विनोद सावदेकर यांच्या डोक्यात पडून त्याचा जागीच मुत्यू झाला.घटनेची माहिती मृतकांच्या नातेवाईकांनी तामगाव पोस्टेला दिली. फिर्यादी वरुन तामगाव पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पळशी झाशी ग्रामस्थांच्या सहकार्याने मृतकाचा मृतदेह बाहेर काढून पंचनामा केल. शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला व तामगाव पोस्टेला मर्ग दाखल केला. अधिक तपास तामगाव पोस्टेचे ठाणेदार राजेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास बीट जमादार प्रमोद मुळे करित आहे.
विहिरीच्या आत असलेले २ मजूर बचावले
विहिरीचे खोदकाम करण्यासाठी विहिरीच्या आत मृतक विनोद सावदेकर सह ३ मजूर उतरून खोदलेली माती क्रेनच्या लोखंडी टपव्दारे विहिरीबाहेर पाठवत होते. मात्र, क्रेन टप वर जाताना वायरोप तुटून मातीने भरलेला लोखंडी टप विनोद सावदेकर यांच्या डोक्यावर पडून त्यांचा जागीच ठार झाले. तर इतर दोन सहकारी मजूर बालबाल बचावले.