धक्कादायक...! मन सुन्न करणारी बातमी; साडेचार वर्षीय अल्पवयीन मुलीवर संत्र्याच्या शेतात नेऊन बलात्कार; संग्रामपूर हादरले....

 
 संग्रामपूर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): महिला व मुलींवरील अत्याचाराच्या घटना सातत्याने वाढीत असताना आता संग्रामपुरातून मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. साडेचार वर्षीय अल्पवयीन मुलीवर एका नराधमाने संत्र्याच्या शेतात नेऊन लैंगिक अत्याचार केला आहे. या घटनेने एकच खळबळ  उडाली असून सोनाळा पोलिसांनी नराधम आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. 

 सुनील कालुसिंग निगवाले (२१, रा. डोईफोडीया, मध्य प्रदेश) असे आरोपीचे नाव आहे. मध्यप्रदेश सीमेला लागून असलेल्या संग्रामपूर तालुक्यातील एका गावात हा प्रकार घडला आहे. आरोपी सुनीलने अल्पवयीन मुलीला एका दुसऱ्या गावातील संत्र्याच्या शेतात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. घटना उजेडात येताच पोलिसांनी नराधम आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सपोनि चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक महादेव खोने, पोलीस कॉन्स्टेबल परमेश्वर तितरे, राहुल पवार करीत आहेत.